पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:32 IST2026-04-03T08:32:10+5:302026-04-03T08:32:48+5:30

आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे.

Afghanistan's 'surgical strike' on Pakistan, tanks enter, military bases destroyed! Three Pakistani soldiers killed, many injured | पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर

पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता  शिगेला पोहोचला आहे. या तणावाने आता युद्धाचे स्वरुप धारण केले आहे. आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे.

पाकिस्तानचे ३ सैनिक ठार -
या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सैनिकांनी खुर्रम भागातील पाकिस्तानी लष्करी तळ आणि एक सैनिकी वाहन पेटून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याकडून तोफांचा आणि रणगाड्यांचा वापर केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोळीबारात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार झाले तर १२ हून अधिक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर केले हतो गंभीर आरोप -
या कारवाईपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ मार्चला पाकिस्तानने कुनार प्रांतात गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर महिला आणि मुलांसह १६ जण जखमी झाले होते. खरे तर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
 
डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर -
याशिवाय, अफगाण भूमीवर ‘टीटीपी’ (पाकिस्तानी तालिबान) सारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो, असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र, हा आरोप फेटाळून लावत टीटीपी ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या आहे, असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे. सध्या डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत.

 

Web Title : पाकिस्तान पर अफ़ग़ानिस्तान का 'सर्जिकल स्ट्राइक', सैन्य ठिकाना ध्वस्त, सैनिक हताहत

Web Summary : दुरंद रेखा पर अफगान बलों द्वारा 'सर्जिकल स्ट्राइक' के साथ तनाव बढ़ गया, जिसमें पाकिस्तानी सैन्य चौकियों को निशाना बनाया गया। हमले में तीन पाकिस्तानी सैनिकों की मौत और कई घायल होने की खबर है। इससे पहले अफगानिस्तान ने पाकिस्तान पर सीमा पार गोलीबारी का आरोप लगाया था। दोनों पक्षों ने दुरंद रेखा पर सेना तैनात की है।

Web Title : Afghanistan 'Surgical Strike' on Pakistan: Military Base Destroyed, Casualties Reported

Web Summary : Tensions escalate as Afghan forces launch a 'surgical strike' across the Durand Line, targeting Pakistani military posts. The attack resulted in casualties, with reports of three Pakistani soldiers killed and multiple injured. Afghanistan previously accused Pakistan of cross-border firing. Both sides have deployed forces to the Durand Line.