तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:20 PM2021-09-15T15:20:57+5:302021-09-15T15:22:48+5:30

दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी अब्दुल गनी हा  प्रमुख होता. यामुळे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जाण्याचे क्रेडीट त्याचाच गड घेतो. मात्र, हक्कानी गट हा तालिबानमधील सर्वात टेरर गट असल्याचे मानले जाते. या गटाचे पाकिस्तानी सैन्यासोबत जवळचे संबंध आहेत.

Afghanistan Fight in taliban abdul ghani baradar left kabul after fight with haqqani network leader | तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

Next

अफगाणिस्तानमध्येतालिबानचे सरकार स्थापन होताच परस्पर संघर्षही सुरू झाला आहे. तालिबान सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून नियुक्त झालेला मुल्ला अब्दुल गनी बरदरने हक्कानी नेटवर्कच्या एका वरिष्ठ नेत्याशी वाद झाल्यानंतर काबूल सोडल्याचे वृत्त आहे. सत्ता वाटपावरून बरादार आणि खलील-उर-रहमान हक्कानी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. (Afghanistan Fight in taliban abdul ghani baradar left kabul after fight with haqqani network leader)

एका वरिष्ठ तालिबानी नेत्याच्या हवाल्याने बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रपती कार्यालयात अंतरिम मंत्रिमंडळावरून वाद झाला होता. तसेच, 15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासूनच नेतृत्व आणि सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष सुरू आहेत.

तालिबानच्या राजकीय शाखेच्या वतीने सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हक्कानी नेटवर्क स्वतःला तालिबानची सर्वात लढाऊ युनिट म्हणवतो. तर बरादरच्या गटाचे म्हणणे आहे, की त्यांच्या मुत्सद्दीपणामुळेच तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळाली आहे. याच बरोबर, हक्कानी नेटवर्कमधील लोकांना वाटते, की अफगाणिस्तानमध्ये विजय लढाईच्या बळावरच मिळाला आहे. 

तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

तत्पूर्वी, दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी अब्दुल गनी हा  प्रमुख होते. यामुळे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जाण्याचे क्रेडीट त्याचाच गड घेतो. मात्र, हक्कानी गट हा तालिबानमधील सर्वात टेरर गट असल्याचे मानले जाते. या गटाचे पाकिस्तानी सैन्यासोबत जवळचे संबंध आहेत.

कंदहार आणि इतर भागांतील तालिबान्यांत सत्त संघर्ष -
तालिबानमध्ये विविध स्थरांवर वाद निर्माण झाले आहेत. कंदहार प्रांतातून आलेले तालिबान नेते आणि उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील नेत्यांमध्येही मतभेद आहेत. कंदहार हा तालिबानचा गड मानला जातो. अशा स्थितीत तेथील नेत्यांना सत्तेत महत्त्वाचा सहभाग हवा आहे. गेल्या काही दिवसांपासून बरादार सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. यामुळे गोळीबारात तो जखमी किंवा मरण पावल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, सोमवारी एक ऑडिओ रिलिज करून आपण सुरक्षित असून प्रवासात असल्याचे बरादरने म्हटले आहे. 

Web Title: Afghanistan Fight in taliban abdul ghani baradar left kabul after fight with haqqani network leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app