अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:41 IST2021-08-30T18:38:42+5:302021-08-30T18:41:13+5:30
हे पत्र शनिवारी प्रकाशित करण्यात आले आणि त्यावर 150 पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र
अफगाणिस्तानवरतालिबानचा कब्जा आणि त्यानंतर लोकांवरी हल्ले, यामुळे तेथे सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच, अफगाणिस्तानचेपत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्स यांनी संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय समुदाय, मानवाधिकार संघटना आणि माध्यमांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांना खुले पत्रे लिहून त्यांच्याकडे संरक्षणाची विनंती केली आहे.
तेथील स्थानिक तुलू न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हे पत्र शनिवारी प्रकाशित करण्यात आले आणि त्यावर 150 पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रात, "माध्यमांतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील वाढती आव्हाने आणि धोका लक्षात घेत, आम्ही संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांना आवाहन करतो, की आमच्या आणि आमच्या कुटुंबीयांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी पावले उचलावीत," असे म्हणण्यात आले आहे.
तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य
माध्यम कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे, की जगाने केवळ परिस्थिती पाहत बसत पाय मागे घेऊ नेय. ज्यांनी गेली दोन दशके अभिव्यक्तीच्या स्वतंत्र्यासाठी न थांबता आणि न थकता काम केले आहे, अशा अफगाणिस्तानातील पत्रकारांच्या रक्षणासाठी पावले उचलायला हवीत.
अहमद नाविद कवोश यांनी म्हटले आहे, की "या कठीण काळात, जगाने केवळ पाहत बसू नये, तर कारवाई करून आमचा आणि आमच्या कुटुंबीयांचा जीव वाचवावा." आणखी एका रफीउल्लाह निकजाद, या पत्रकाराने म्हटले आहे, की “आम्ही अनिश्चिततेच्या स्थितीत जगत आहोत. आमचे अथवा आमच्या भविष्याचे काय होईल, हे अम्हाला माहीत नाही. जागातील बंधूंनी आमचा आवाज अवश्य ऐकायला हवा."
अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!