मोठी बातमी! पाकिस्तानच्या हल्ल्यात तालिबानचे शिक्षणमंत्री निदा मुहम्मद ठार? तुर्की मीडियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:52 IST2026-02-27T13:51:13+5:302026-02-27T13:52:08+5:30
Pakistan-Afghanistan War Marathi News: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता टोकाला गेला असून, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले आहे. या युद्धादरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानच्या हल्ल्यात तालिबानचे शिक्षणमंत्री निदा मुहम्मद ठार? तुर्की मीडियाचा दावा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद विकोपाला गेला असून, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जोरदार युद्ध सुरू झाले आहे. या संघर्षात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तुर्की मीडिया आउटलेट 'रॉयल टाईम न्यूज डॉट कॉम'ने दावा केला आहे की, पाकिस्तानने केलेल्या एका भीषण हल्ल्यात अफगाणिस्तानचे शिक्षण मंत्री निदा मुहम्मद नदीम ठार झाले आहेत.
तुर्की मीडियाच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दाक शहरात पाकिस्तानने हा हल्ला केला. या मोहिमेत तालिबानच्या एका प्रमुख कमांडरला घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. या वाहनात अफगाण तालिबानचे शिक्षणमंत्री निदा मुहम्मद नदीम बसले होते. सोशल मीडियावर या हल्ल्याचे फोटो व्हायरल झाले असून, त्यामध्ये एक वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे.
🔴 پاکستان نے افغانستان کے شہر اسپن بولدک میں ایک گاڑی کو نشانہ بنایا جس کے بارے خبر تھی اس میں اہم کمانڈر ہے۔
— RTEUrdu (@RTEUrdu) February 27, 2026
▪️ اس گاڑی میں افغان طالبان کا وزیر تعلیم ندا محمد ندیم تھا۔اس سے پہلے یہ ننگرہار کا گورنر بھی رہا۔ حملے میں مارا گیا۔
▪️ 133 طالبان کی ہلاکت کی آزاد ذرائع نے تصدیق… pic.twitter.com/zwP2XbNHnQ
स्वतंत्र सूत्रांचा हवाला देत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, या कारवाईत केवळ शिक्षण मंत्रीच नव्हे, तर १३३ तालिबानी तरुण ठार झाले असून २०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या या आक्रमक कारवाईत अफगाणिस्तानचे प्रचंड लष्करी नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अफगाण कॉर्प्स मुख्यालय आणि तीन ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त झाले. दोन शस्त्रास्त्र साठा आणि एक लॉजिस्टिक्स बेस नष्ट झाले असून ८० हून अधिक टँक, तोफखाना आणि अनेक लष्करी वाहनांचे नुकसान झाले.
सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या सैन्याकडून एकमेकांवर जोरदार गोळीबार आणि हल्ले सुरू आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तालिबान सरकार किंवा पाकिस्तान सरकारकडून या दाव्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.