अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:26 IST2025-05-18T19:22:46+5:302025-05-18T19:26:12+5:30

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाकामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. हे प्रकरण जुलै २०२४ मधील आहे. 

Actress Nusrat Faria arrested at Dhaka airport; In which case was action taken? | अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

Actor Nusrat Faria News: बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर्रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अटक करण्यात आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारियाचे नाव हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात समोर आले आहे. या प्रकरणातच तिला परदेशी जाण्यापूर्वी विमानतळावर अटक करण्यात आले. 

हत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण, विमानतळावर रोखले

३१ वर्षीय अभिनेत्री नुसरत फारिया ही रविवारी (१८ मे) सकाळी नऊ वाजता थायलंड निघाली होती. ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायग्रेशन करण्याआधीच्या चेकपॉईंटवर तिला रोखण्यात आले. 

वाचा >>'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

नुसरत फारियाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. 

जुलै २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरोधात मोठे आंदोलन उसळले होते. याच आंदोलनाशी संबंधित हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात तिचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

2024 मधील ते प्रकरण काय?

नुसरत फारियासह एकूण १७ कलाकारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ढाकातील वातारा भागात एका विद्यार्थ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जुलै २०२४ मध्ये मोठे विद्यार्थी आंदोलन झाले होते, त्याच दरम्यान ही घटना घडलेली असल्याचे ढाका ट्रिब्युनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

ढाकातील बड्डा झोनचे सहायक पोलीस आयुक्त शफिकुल इस्लाम यांनी सांगितले की, नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला वॉटर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर ढाका शहर पोलीस गुप्तचर शाखेत नेण्यात आले. 

चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी २०२३ मध्ये मुजिब : द मेकिंग ऑफ अ नेशन हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात नुसरत फारियाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. 

Web Title: Actress Nusrat Faria arrested at Dhaka airport; In which case was action taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.