एका 'टिप'मुळे अमेरिकन सैन्यावर ओढावलं 'संकट', US एअरबेसवरील इराणच्या भीषण हल्ल्यामागे रशियन सॅटेलाईटचा 'हात'! खळबळजनक दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:30 IST2026-03-29T10:29:45+5:302026-03-29T10:30:23+5:30

२६ मार्च रोजी इराणने प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ला केला, इराणने ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ ड्रोनच्या साहाय्याने मोठा हल्ला चढवला. येथे अमेरिका आणि सौदी अरेबियाचे सैन्य तैनात आहे. 

A tip caused disaster for the American military Russian satellite's 'hand' behind Iran's deadly attack on US airbase Sensational claim | एका 'टिप'मुळे अमेरिकन सैन्यावर ओढावलं 'संकट', US एअरबेसवरील इराणच्या भीषण हल्ल्यामागे रशियन सॅटेलाईटचा 'हात'! खळबळजनक दावा!

एका 'टिप'मुळे अमेरिकन सैन्यावर ओढावलं 'संकट', US एअरबेसवरील इराणच्या भीषण हल्ल्यामागे रशियन सॅटेलाईटचा 'हात'! खळबळजनक दावा!


रशिया आणि इराण यांच्या लष्करी सहकार्यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या 'प्रिन्स सुलतान एअरबेस'वर केलेल्या हल्ल्यापूर्वी, रशियाने या तळाचे सॅटेलाईट फोटो इराणसोबत शेअर केले होते. या माहितीमुळेच इराणला अमेरिकन सैनिकांवर अचूक आणि घातक हल्ला करणे शक्य झाले, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले, "इराणला मदत करणे हे पूर्णपणे रशियाच्या हिताचे आहे. रशिया इराणसोबत गुप्त माहिती शेअर करतो, याची मला पूर्ण खात्री आहे. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने गोळा केलेल्या माहितीनुसार, रशियन सॅटेलाईटने २०, २३ आणि २५ मार्चला सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान हवाई तळाची छायाचित्रे मिळवली होती. २६ मार्च रोजी इराणने प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ला केला, इराणने ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ ड्रोनच्या साहाय्याने मोठा हल्ला चढवला. येथे अमेरिका आणि सौदी अरेबियाचे सैन्य तैनात आहे. 

असोसिएटेड प्रेसने, संबंधित सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान १५ सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत. तत्पूर्वी, अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, किमान १० अमेरिकन सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनच्या पूर्वीच्या अनुभवावरून असे दिसून येते की मॉस्कोकडून वारंवार येणारी उपग्रह छायाचित्रे अनेकदा लष्करी कारवाई दर्शवतात.

यासंदर्भात पुढे बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "एकदा फोटो घेणे म्हणजे तयारी, दुसऱ्यांदा फोटो घेणे म्हणजे सराव आणि तिसऱ्यांदा फोटो घेतले की समजायचे, एक-दोन दिवसात हल्ला होणार," असे त्यांनी युक्रेनच्या अनुभवावरून स्पष्ट केले. दरम्यान, "या माहितीमध्ये उपग्रह छायाचित्रांचा थेट पुरावा किंवा कीवला ही माहिती कशी मिळाली यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही," असेही एनबीसीने म्हटले आहे.
 

Web Title : रूसी सैटेलाइट जानकारी से ईरान ने किया अमेरिकी एयरबेस पर हमला?

Web Summary : ज़ेलेंस्की का दावा है कि रूस ने हमले से पहले ईरान के साथ एक अमेरिकी एयरबेस की सैटेलाइट तस्वीरें साझा कीं, जिससे संभावित रूप से हमले में मदद मिली। हमले में अमेरिकी सैनिक घायल हो गए।

Web Title : Russian Satellite Intel Led to Iranian Attack on US Airbase?

Web Summary : Zelensky claims Russia shared satellite images of a US airbase with Iran before an attack, potentially aiding the strike. The attack injured US soldiers.