नेतन्याहू यांची पत्नी अन् PM मोदींच्या ड्रेसचं दिसलं खास कनेक्शन, काय म्हणाले पंतप्रधान? इस्रायल दौऱ्यातील 'त्या' क्षणांची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:35 IST2026-02-25T20:34:30+5:302026-02-25T20:35:04+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल बाजूला सारून आपली पत्नी सारा नेतन्याहू यांच्यासह स्वतः विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे स्वागत केले. यावरून उभय देशांतील दृढ संबंधांची प्रचिती येते.

नेतन्याहू यांची पत्नी अन् PM मोदींच्या ड्रेसचं दिसलं खास कनेक्शन, काय म्हणाले पंतप्रधान? इस्रायल दौऱ्यातील 'त्या' क्षणांची जोरदार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल बाजूला सारून आपली पत्नी सारा नेतन्याहू यांच्यासह स्वतः विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे स्वागत केले. यावरून उभय देशांतील दृढ संबंधांची प्रचिती येते.
खास योगायोग -
दरम्यान पंतप्रधानांच्या स्वागतावेळी एक गमतीशीर प्रसंग बघायला मिळाला. पंतप्रधान मोदींनी लावलेले 'पॉकेट स्क्वेअर' आणि सारा नेतन्याहू यांचा पोषाख यांचा रंग एकसारखा म्हणजेच (नारंगी अथवा भगवा) होता. ही बाब बेंजामिन नेतन्याहू यांच्या लक्षात येताच त्यांनी हसत त्याकडे दोघांचेही लक्ष वेधले. यावर पंतप्रधान मोदींनी त्वरित 'भगवा' असे उत्तर दिले. यावेळी तिघेही मोकळ्या मनाने हसले.
सारा यांच्याकडून भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक -
यावेळी सारा नेतन्याहू यांनी भारताचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, "भारत हा एक अद्भुत देश आहे. जेथे विविधता आणि प्रगती दोन्हींचाही संगम आहे." याशिवाय, पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोदींचा उल्लेख 'प्रिय मित्र' आणि 'जबरदस्त नेता' असा केला.
या मुद्द्यांवर होणार चर्चा -
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निमंत्रण दिले आहे. आपल्या या दौऱ्यादरम्यान मोदी इस्रायली संसदेलाही (नेसेट) संबोधित करतील. याशिवाय, ते राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्जोग यांची भेट घेतील, तसेच 'यद वाशेम' या होलोकॉस्ट स्मारकालाही भेट देतील. या ऐतिहासिक भेटीमध्ये संरक्षण, व्यापार, सायबर सुरक्षा आणि स्टार्टअप सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.