शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 6:39 AM

‘सीरम’च्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी लसींचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला निर्यात होणारे ‘कोविशील्ड’ लसीचे ५०  लाख डोस भारतातच वापरण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

देशात सुरु असलेले लसीकरण आणि त्यांची उपलब्धता यांचा विचार करता ब्रिटनला निर्यात होणाऱ्या या साठ्याच्या वापर भारतातच करावा, अशी विनंती "सीरम"चे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. केंद्राने तीन मान्य केली आहे. त्यामुळे सरकारकडे ५० लाख डोसेसचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा २१ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमध्ये १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सरकारने १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली होती. मात्र, लसींचा तुटवडा असल्यामुळे अनेक राज्यांनी तिसरा टप्पा लांबणीवर टाकला. तसेच ज्या राज्यांनी सुरू केला, तेथे संथ गतीने लसीकरण होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना व्यापक लसीकरणाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या