अमेरिकेतील बियर कंपनीत अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:10 AM2020-02-27T09:10:07+5:302020-02-27T09:30:46+5:30

Shooting At Molson Coors : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्लेखोराची तुलना सैतानाशी केली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे.

5 death Shooting At Molson Coors in USA BKP | अमेरिकेतील बियर कंपनीत अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

अमेरिकेतील बियर कंपनीत अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देअमेरिकेतील एका बियर कंपनीत एका माथेफिरू हल्लेखोराकडून बेछूट गोळीबार गोळीबारात पाच जणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेले पाचही जण मोलसन कूर्स कॉम्प्लेक्सचे कर्मचारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्लेखोराची सैतानाशी केली तुलना

वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका बियर कंपनीत एका माथेफिरू हल्लेखोराने केलेल्या बेछूट गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी अमेरिकेतील विस्कॉन्सिन प्रांतातील बियर कंपनीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पाचही जण मोलसन कूर्स कॉम्प्लेक्सचे कर्मचारी होते. दरम्यान, हल्ल्यातील हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर मोलसन कूर्स कॉम्प्लेक्समध्येच काम करत होता. काम करत असलेल्या ठिकाणीच त्याने हा बेछूट गोळीबार केला. बियर तयार करणाऱ्या या कंपनीत सुमारे ७५० लोक काम करतात. दरम्यान, हल्लेखोराचा मृत्यू झाला असून, आता या परिसरात कुठलाही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



पोलीस प्रमुख अल्फोन्सो मोरालेस यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोर हा मिल्वोकी येथील रहिवासी होता. त्याचा स्वत:च्याच बंदुकीमधून चाललेली चाललेली गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. महापौर टॉम बेरेन म्हणाले की, हा प्रकार खूप भयानक होता. येथील कर्मचाऱ्यांसाठी ती वेळ खूपच भयानक होती. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्लेखोराची तुलना सैतानाशी केली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या 

माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ

‘अब आओ उडा दुंगा’; धमकावणाऱ्या 'टायगर'चा नांदेड पोलिसांनी केला एन्काऊंटर

५ रुपये ठरले जीवघेणे, रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या

Web Title: 5 death Shooting At Molson Coors in USA BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.