2 rupees proved to be life-threatening, rickshaw-puller murdered | ५ रुपये ठरले जीवघेणे, रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या

५ रुपये ठरले जीवघेणे, रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या

ठळक मुद्देरामदुलार सरजू यादव (६८) हा मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर आपल्या ऑटो रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेला होता. या प्रकरणी गॅस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना भा. दं. वि. कलम ३०२ (हत्या) आणि इतर प्रासंगिक कलमांतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. 

मुंबई - बोरिवली परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याने सीएनजी गॅस स्टेशनवरील कर्मचाऱ्याकडे उरलेले ५ रुपये मागितले. त्यानंतर झालेल्या वादातून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदुलार सरजू यादव (६८) हा मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर आपल्या ऑटो रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेला होता. तेथून त्याने आपला मुलगा संतोषला फोन केला. २०५ रुपये गॅस भरल्यानंतर यादव यांनी गॅस स्टेशनच्या अटेंडंटला ५०० रुपयांची नोट दिली. त्याने २९५ रुपये परत करण्याऐवजी ५ रुपये कमी दिले आणि २९० रुपये दिले. यावर यादव यांनी आपले शिल्लक असलेले ५ रुपये मागितले त्यावेळी अटेंडंट संतोष जाधवने चालक आणि त्याच्या मुलाशी गैरवर्तणूक केली. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात वयोवृद्ध रिक्षाचालक बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आम्ही या प्रकरणी गॅस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना भा. दं. वि. कलम ३०२ (हत्या) आणि इतर प्रासंगिक कलमांतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. 

English summary :
68 year old auto rickshaw driver to death after he asked for his due money Rs 5 in Borivali.

Web Title: 2 rupees proved to be life-threatening, rickshaw-puller murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.