चीनमधील नौकाबुडीत २६ ठार

By Admin | Updated: June 4, 2015 00:37 IST2015-06-04T00:37:59+5:302015-06-04T00:37:59+5:30

चीनमधील यांगत्सी नदीत बुडालेल्या जहाजातील २६ लोकांचे मृतदेह मिळाले असून, किमान ४०० जण अद्याप बेपत्ता आहेत.

26 killed in China boat machete | चीनमधील नौकाबुडीत २६ ठार

चीनमधील नौकाबुडीत २६ ठार

जियान्ली- (चीन) : चीनमधील यांगत्सी नदीत बुडालेल्या जहाजातील २६ लोकांचे मृतदेह मिळाले असून, किमान ४०० जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघात होऊन ४० तास उलटले असल्याने जिवंत लोक मिळण्याची शक्यता कमी झाली असली तरीही मदत कार्यकर्ते खराब हवामानातही सुखरूप लोकांचा शोध घेत आहेत.
इस्टर्न स्टार क्रूज शिप हे जहाज ४५६ प्रवाशांसह आशियातील सर्वात लांब नदी असणाऱ्या यांगत्सी नदीत बुडाले. या अपघाताला आता ४० तास उलटून गेले असल्याने, सुखरूप लोक मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मदतकार्यासाठी ११० शोधनौका व ३ हजार मदत कार्यकर्ते काम करत आहेत. वाईट हवामानामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. हेलिकॉप्टरही शोधकार्यास मदत करीत आहेत.
दरम्यान, या अपघातात बेपत्ता असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक प्रक्षुब्ध मन:स्थितीत असून, त्यांची शांघाय येथील अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. या अपघाताची माहिती मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अपघातग्रस्त जहाजात असलेले बहुतांश प्रवासी शांघाय व त्याच्या जवळचे राज्य जियांग्त्सू येथील होते.

 

 

Web Title: 26 killed in China boat machete