कोवळ्या वयातच तिने करुन घेतली नसबंदी, भविष्यात मुल नकोच...कारण समजल्यावर हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 18:05 IST2022-02-20T18:01:31+5:302022-02-20T18:05:02+5:30
एका तरुणीने मात्र लग्न आणि मूल होण्याआधीच नसबंदी करून घेतली आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

कोवळ्या वयातच तिने करुन घेतली नसबंदी, भविष्यात मुल नकोच...कारण समजल्यावर हैराण व्हाल
सामान्यपणे मुलं झालं की काही कपल नसबंदी करून घेतात. नसबंदी म्हणजे कायमचा गर्भनिरोधक पर्याय (methods of contraception). एक-दोन मुलं झाली की त्यानंतर आणखी मूल नको म्हणून हा मार्ग स्वीकारला जातो (Female sterilization). पण एका तरुणीने मात्र लग्न आणि मूल होण्याआधीच नसबंदी करून घेतली आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत (Woman sterilized before marriage and kids).
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles, America) राहणारी २४ वर्षांची एबी रामसे (Abby Ramsay). ना तिचं लग्न झालं आहे, ना तिला मुलं आहेत. पण तरी त्याआधीच तिने नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय जितका धक्कादायक आहे, त्यामागील कारण त्यापेक्षाही धक्कादायक आहे.
डेली स्टारशी बोलताना एबीने सांगितलं, ती अशा शाळेत शिकली, अशा कुटुंबात वाढली जिथं नेहमी कुटुंब आणि ते वाढवण्याचं महत्त्व सांगण्यात आलं. पण रिलेशिपनमध्ये असताना जेव्हा ती गर्भनिरोधक औषधं घ्यायची किंवा इतर गर्भनिरोधक पर्यायांचा अवलंब करायची तेव्हा तिला शारीरिकरित्या त्रास व्हायचा. एकदा तर ती गर्भनिरोधक पर्याय फेल झाल्याने प्रेग्नंटही झाली. तेव्हा ती खूप घाबरली. तिच्या मनात प्रेग्नन्सीची भीती निर्माण झाली. आपल्याला स्वतःला कधीच प्रेग्नंट अवस्थेत पाहायचं नाही, त्यामुळे नसबंदी करून घेतली.
एबी म्हणाली, "मेनोपॉजपर्यंत महिलांना आपल्या प्रेग्नन्सीबाबत विचार करावा लागतो, या चिंतेने त्यांना शांतपणे आयुष्य जगता येत नाही. लोकांना वाटतं की गर्भनिरोधसाठी थेट सर्जरीचा पर्याय योग्य नाही. पण जेव्हापासून मी सर्जरी केली तेव्हापासून मला प्रेग्नन्सीची बिलकुल चिंता नाही आणि यामुळे मी खूप खूश आहे. सर्जरी करण्यांचं आपण योग्य पाऊल उचललं." एबी कर्ट नावाच्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यालासुद्धा तिच्या नसबंदीमुळे काहीच फरक पडत नाही, असंही तिने सांगितलं.