येमेनमध्ये वृद्धाश्रमावर गोळीबारात १६ ठार, मृतांमध्ये चार भारतीय नन्स

By Admin | Updated: March 4, 2016 17:22 IST2016-03-04T17:20:18+5:302016-03-04T17:22:42+5:30

येमेनच्या दक्षिणेला असलेल्या अडेन येथील एका वृद्धाश्रमावर शुक्रवारी अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी वुद्धाश्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला.

16 killed in firing at Yarman, four Indian Nuns in the dead | येमेनमध्ये वृद्धाश्रमावर गोळीबारात १६ ठार, मृतांमध्ये चार भारतीय नन्स

येमेनमध्ये वृद्धाश्रमावर गोळीबारात १६ ठार, मृतांमध्ये चार भारतीय नन्स

 ऑनलाइन लोकमत 

अदेन,दि. ४ -  येमेनच्या दक्षिणेला असलेल्या अडेन येथील एका वृद्धाश्रमावर शुक्रवारी अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी वुद्धाश्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जण ठार झाले असून, यात ४ भारतीय नन्सचा समावेश आहे. 
 
वृद्धाश्रमात घुसल्यानंतर त्यांनी नन्सना एकाबाजूला केले व त्यांच्यावर गोळया झाडल्या. त्यानंतर त्यांनी वृद्धांच्या हातात बेडया ठोकल्या व त्यांच्यावर अंदाधुंद गोळया झाडल्या. अदेनच्या शेख ओसमान जिल्ह्यामध्ये हा वृद्धाश्रम आहे. 
 
सौदीच्या फौजांनी शिटी हौथी बंडखोरांच्या ताब्यातून अदेनचा ताबा मिळवल्यापासून येथे अराजकाचे राज्य आहे. येथे नावालाही कायदा राहिलेला नाही. इसिसने अदेनमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 
 
 

Web Title: 16 killed in firing at Yarman, four Indian Nuns in the dead