Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:03 IST2025-09-02T08:02:22+5:302025-09-02T08:03:59+5:30

Sudan landslide death News: सुदानच्या पश्चिम भागात मार्रा पर्वत रांगेच्या पायथ्याला असलेल्या अख्ख्या गावाचाच भूस्खलनाने घास घेतला. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 

1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident | Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

(Photo: X/@noskhabar_ae)

Sudan landslide News: निसर्गाच्या प्रलयाने सुदान हादरले. भूस्खलन होऊन मातीचा प्रचंड मोठा मलबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळला. यात तब्बल १००० लोक मरण पावले आहेत. सुदानच्या लष्कराकडून ही माहिती देण्यात आली आहे. लिबरेशन मुव्हमेंटने म्हटले आहे की, सोमवारी झालेल्या भूस्खलनामुळे गाव पूर्ण उद्ध्वस्त झाले असून, एक हजार लोक मरण पावले आहेत. 

सुदानच्या पश्चिमेला असलेल्या मार्रा पर्वत क्षेत्रामध्ये ही घटना घडली आहे. भूस्खलन होऊन प्रचंड मोठा मातीचा मलबा खाली आला. यात संपूर्ण गाव गाडले गेले. या घटनेत फक्त एक लहान मुलगा वाचला असल्याची माहिती सुदान लष्कराने दिली.   

पावसाचा कहर, नंतर मृत्यूचे तांडव

अब्देलवाहिद मोहम्मद नूर यांच्या नेतृत्वाखाली लिबरेशन मुव्हमेंटने एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दलची माहिती दिली आहे. सुदानच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. पावसामुळे ही भूस्खलनाची घटना घडली. 

३१ ऑगस्ट रोजी भूस्खलन झाले. संपूर्ण मातीचा ढिग गावावर कोसळला. त्यात सगळी घरे दबली गेली. पावसानंतर झालेल्या भूस्खलनाने मृत्यूने तांडव घातले. लिबरेशन मुव्हमेंटने संयुक्त राष्ट संघ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे ढिगाऱ्याखाली मृत्यू झालेल्यांचे मृतदेह काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. अब्देलवाहिद मोहम्मद नूरच्या नेतृत्वाखाली संघटनेने दारफूर क्षेत्रावर ताबा घेतलेला आहे. त्याच भागात ही घटना घडली आहे. 

Web Title: 1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.