१,००० बाहूंच्या बुद्ध मूर्तीचा जीर्णोद्धार

By Admin | Updated: June 14, 2015 03:07 IST2015-06-14T02:25:05+5:302015-06-14T03:07:29+5:30

चीनच्या तज्ज्ञांनी गौतम बुद्ध यांच्या सहस्त्र बाहूंच्या दुर्मिळ व ८०० वर्षे जुन्या मूर्तीला मूळ रूप प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण केले आहे.

1,000 Buddha statue restoration | १,००० बाहूंच्या बुद्ध मूर्तीचा जीर्णोद्धार

१,००० बाहूंच्या बुद्ध मूर्तीचा जीर्णोद्धार

बीजिंग : चीनच्या तज्ज्ञांनी गौतम बुद्ध यांच्या सहस्त्र बाहूंच्या दुर्मिळ व ८०० वर्षे जुन्या मूर्तीला मूळ रूप प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण केले आहे. सिचुआन प्रांतातील दाजू परगण्यात असलेल्या या मूर्तीच्या जीर्णोद्धाराचे काम २००८ साली सुरू झाले होते.
सुमारे ९८ लाख डॉलर खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले. आता लोक एक हजार हातांची ही बुद्धमूर्ती नव्या रूपात पाहू शकतात, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
एखाद्या मूर्तीच्या जिर्णोद्धाराचा हा सर्वात मोठा प्रकल्प होता. या कामासाठी कामगारांनी मूर्तीची ८३० हात पुन्हा तयार केले व या कामासाठी २२७ उपकरणांचा वापर करण्यात आला.

Web Title: 1,000 Buddha statue restoration