दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:00 IST2026-01-30T06:00:20+5:302026-01-30T06:00:43+5:30

Manpreet Singh: भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही.

Veteran Manpreet Singh dropped | दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले

दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले

नवी दिल्ली - भारतीयहॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. हॉकी इंडियाने गुरुवारी ही संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली. पुढील महिन्यात राऊरकेला येथे प्रो लीगचा हंगाम सुरू होणार आहे.

दाेन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघांचा सदस्य आणि मनप्रीत १५ वर्षांत पहिल्यांदाच शिबिरासाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. हॉकी इंडियाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या सर्वाधिक ४१२ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून मनप्रीत  एक सामना दूर आहे (त्याचे ४११ सामने झाले आहेत.). राऊरकेला येथे १० ते १५ फेब्रुवारीत एफआयएच प्रो लीग सामन्यांपूर्वी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान हे सराव शिबिर आयोजित केले जाईल. या यादीत गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक यालाही स्थान दिलेले  नाही. 

संभाव्य खेळाडूंची यादी :
गोलकीपर : पवन, सूरज करकेरा, मोहित शशिकुमार, प्रिन्सदीप सिंग. बचावपटू : अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, सुमित, पुवन्ना चंदुरा बोबी, यशदीप सिवाच, नीलम संजीप झेस, अमनदीप लाकडा. मध्यरक्षक : राजिंदर सिंग, मनमीत सिंग, हार्दिक सिंग, मोइरांगथेम रबीचंद्र सिंग, विवेक सागर प्रसाद, विष्णू कांत सिंग, राज कुमार पाल, नीलकांता शर्मा, रोशन कुजूर. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, शीलानंद लाकडा, मनदीप सिंग, अरजीत सिंग हुंदल, अंगद बीर सिंग, उत्तम सिंग, सेल्वम कार्थी, आदित्य अर्जुन लालगे, मनिंदर सिंग.

Web Title : दिग्गज मनप्रीत सिंह राष्ट्रीय हॉकी शिविर से बाहर

Web Summary : हॉकी इंडिया ने एफआईएच प्रो लीग के लिए राष्ट्रीय शिविर के संभावितों से दिग्गज मनप्रीत सिंह को बाहर कर दिया। दो बार के ओलंपिक पदक विजेता मनप्रीत 15 वर्षों में पहली बार चूक गए। शिविर राउरकेला में प्रो लीग मैचों से पहले है। गोलकीपर कृष्ण बहादुर पाठक भी बाहर हैं।

Web Title : Veteran Manpreet Singh Excluded from National Hockey Camp

Web Summary : Hockey India omitted veteran Manpreet Singh from the national camp probables for the FIH Pro League. A two-time Olympic medalist, Manpreet misses out for the first time in 15 years. The camp precedes Pro League matches in Rourkela. Goalkeeper Krishna Bahadur Pathak is also excluded.