भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 21:32 IST2025-10-14T21:00:44+5:302025-10-14T21:32:01+5:30
India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw : पहिल्या ४२ मिनिटांच्या खेळात पाकिस्तानी संघाकडे होती २-० अशी भक्कम आघाडी, पण...

भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
Sultan Of Johor Cup 2025 India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw : मलेशियातील मैदानात रंगलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील २१ वर्षांखालील हॉकी संघातील सुल्तान ऑफ जोहोर चषक स्पर्धेतील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. तमन दया हॉकी स्टेडियमवर शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यानंतर निकालापेक्षाही दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केलं का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होते. पण हॉकीच्या मैदानात मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ह
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हॉकीच्या मैदानात क्रिकेट मॅचमध्ये दिसलं त्यापेक्षा वेगळं चित्र
Before #PAKvIND at Sultan Johor Hockey Cup, India's junior hockey team greeted Pakistan players with grace. A lesson for @BCCI & @ICC. What the Indian cricket team did under ICC umbrella broke the spirit of sport & is evidence of planned theatrics shamed the game. @MohsinnaqviC42pic.twitter.com/si7de6wtPt
— Maham Fazal (@MahamFazal_) October 14, 2025
मॅच सुरु होण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी हातमिळवणी केली नसली तरी हातवारे करत एकमेकांना अभिवादन करत सामन्याला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या संघाने २-० अशी आघाडी घेतल्यावर भारतीय युवा संघाने दमदार कमबॅक करत शेवटच्या क्वॉर्टरमध्ये ३-२ अशी आघाडी घेतली होती. पण शेवटच्या क्षणी पाकिस्तानच्या संघाने आणखी एक गोल डागला आणि सामना बरोबरीत सुटला. हा सामना संपल्यावरही दोन्ही संघातील खेळाडूंनी हातमिळवणी केली नसली तरी जसा सामना सुरु केला त्याच प्रकारे लांबूनच हातवारे करून एकमेकाना अभिवादन केल्याचे पाहायला मिळाले.
🚨 Pakistan and Indian hockey players had handshakes during the match in Sultan Johar Cup 2025. pic.twitter.com/L37DFi40oH
— Ahmad Haseeb (@iamAhmadhaseeb) October 14, 2025
Indian Junior Men’s Hockey Team displayed unmatched spirit & resilience in a pulsating clash at the Sultan of Johor Cup 2025! 🏑
— SAI Media (@Media_SAI) October 14, 2025
Extraordinary goals from Arijeet Singh Hundal, Sourabh Anand Kushwaha & Manmeet Singh made it 3-3 powered India’s fightback before Pakistan struck… pic.twitter.com/0SnfdbjfTq
पहिल्या ४२ मिनिटांच्या खेळात पाकिस्तानी संघाकडे होती २-० अशी भक्कम आघाडी, पण...
𝐀 𝐠𝐚𝐦𝐞 𝐟𝐮𝐥𝐥 𝐨𝐟 𝐭𝐰𝐢𝐬𝐭𝐬 𝐚𝐧𝐝 𝐭𝐮𝐫𝐧𝐬! 🔥
India bounce back from 0–1 down to share the spoils in a 3–3 thriller against Pakistan. 🇮🇳#HockeyIndia #IndiaKaGamepic.twitter.com/Yxd1KVSDTo— Hockey India (@TheHockeyIndia) October 14, 2025
पाकिस्तानच्या संघानं पहिल्या क्वार्टरमधील पाचव्या मिनिटालाच पहिला गोल डागत सामन्यात आघाडी घेतली. एवढेच नाही तर ३९ व्या मिनिटाला त्यांनी आणखी एक गोल डागत २-० अशी आघाडी घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले.पण त्यानंतर ४३ व्या मिनिटाला भारतीय संघानं कमबॅक केले. अरिजीत सिंग हुंदल याने भारताकड़ून पहिला गोल डागला. पुढच्या पाचव्या मिनिटांत म्हणजे ४८ व्या मिनिटाला सौरभ आनंद कुशवाहा याने आणखी एक गोल करत भारतीय संघाला सामन्यात २-२ अशी बरोबरी मिळून दिली. हा धडाका कायम ठेवत भारताने ५१ व्या मिनिटाला भारताकडून मनमीत सिंग याने तिसरा गोल केला. भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी मिळवल्यावर शेवटच्या क्षणात मॅच फिरली. ५४ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या संघाने गोल डागला अन् सामना बरोबरीत सुटला.