शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 22:29 IST

विश्वचषक हॉकी स्पर्धा : इंग्लंड पराभूत; टॉम क्रेगची हॅट्ट्रिक

भुवनेश्वर:  टॉम क्रेगने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर येथे सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८-१ असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. बॅरी मिडल्टनने इंग्लंडकडून एकमेव गोल नोंदवला. स्पर्धेच्या इतिहासातील आॅस्ट्रेलियाचे हे पाचवे कांस्यपदक आहे.

उपांत्यफेरीत नेदरलंडकडून पेनल्टी शूटआऊटवर झालेल्या पराभव विसरुन आॅस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरला होता. तीन वेळा चॅम्पियन असलेल्या आॅस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या क्वॉर्टरमध्येच दोन गोलची आघाडी घेतल्याने इंग्लंडचे खेळाडू दबावाखाली आले.

आॅस्ट्रेलियाकडून टॉम क्रेगने सामन्याच्या ९ व्या, १९ व्या व ३४ व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साधली. ब्लेक गोव्हर्सने आठव्या मिनिटाला गोल करत आॅस्ट्रेलियाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. ट्रेंट मिटन याने ३२ व्या मिनिटाला गोल करत संघाला ४-० अशी भक्कम आघाडी साधून दिली. त्यानंतर लगेच दोन मिनिटात दोन गोल करत आॅस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. टिम ब्रॉँड व क्रेग यांनी हे गोल केले.

इंग्लंडकडून एकमात्र गोल बॅरी मिडल्टन याने तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये केला. शेवटच्या तीन मिनिटात मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नवर आॅस्ट्रेलियाच्या जरेमी हॅवर्ड याने गोल करत ८-१ असा मोठा विजय मिळवून दिला. टॉम क्रेग याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.मागील दोन्ही विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला चौथ्या स्थानी समाधाना मानावे लागले होते. इंग्लंडने १९८६ मध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाAustraliaआॅस्ट्रेलिया