hockey : भारताने विजयाची संधी गमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 23:13 IST2018-06-28T23:13:13+5:302018-06-28T23:13:55+5:30
चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले.

hockey : भारताने विजयाची संधी गमावली
ब्रेडा (नेदरलँड्स ) : चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले.
बेल्जियमच्या लोइक ल्युपाएर्टने 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने 10व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. 60व्या मिनिटाला बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिऴाला, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सुरेखरित्या तो अडवत भारताचा पराभव टाऴला.
या निकालानंतरही भारताच्या अंतिम फेरीच्या आशा जिवंत आहेत. मात्र, शनिवारी त्यांना नेदरलँड्सला नमवावे लागणार आहे.
#HCT2018@TheHockeyIndia v @hockeybe https://t.co/W4QATN1qhVhttps://t.co/8WmUZUo3eypic.twitter.com/5A14aHxp2R
— FIH (@FIH_Hockey) June 28, 2018