हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:34 IST2018-07-19T19:34:16+5:302018-07-19T19:34:51+5:30

पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला.

Hockey: India beat New Zealand, Rupinderpal Singh's two goals | हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

बंगळुरु : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांचा मालिकेला भारताच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला रुपिंदरने पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मनदीपने 13 मिनिटांत दुसरा गोल केला. पण भारताला 2-0 अशी आघाडी फक्त दहा मिनिटेच टिकवता आली. कारण सामन्याच्या 26व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेने गोल केला. 

न्यूझीलंडकडून एक गोल स्वीकारल्यावर भारतीय संघ शांत बसला नाही. त्यांनी आक्रमणावर अधिक भर दिला. सामन्याच्या 34व्या मिनिटाला रुपिंदरने वैयक्तिक दुसरा गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. भारताच्या हरमनप्रीतनेही त्यानंतर चार मिनिटांनी गोल केला आणि संघाला 4-1 अशी दमदार आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडच्या स्टीफन्सने सामन्याच्या 55व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या 55 व्या मिनिटानंतर एकही गोल झाला नाही आणि भारताने हा सामना 4-2 असा जिंकला.

Web Title: Hockey: India beat New Zealand, Rupinderpal Singh's two goals