शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एफआयएच सिरीज हॉकी :भारतीय महिला अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 5:03 AM

ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

हिरोशिमा : ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयासह भारताने टोकियो आॅलिम्पिक पात्रतेची देखील अंतिम फेरी गाठली आहे.या स्पर्धेतील आघाडीचे दोन्ही संघ यंदा २०२० आॅलिम्पिकच्या अंतिम पात्रता फेरीत खेळणार आहेत. गुरजीत कौरने २० आणि २२ व्या मिनिटाला तसेच नवनीत कौरने ३१ व्या आणि कर्णधार राणी रामपालने ५७ व्या मिनिटाला गोल केला. चिलीकडून कॅरोलिना गार्सियाने १८ व्या तसेच मॅन्यूएला उरोजने ४३ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदविला. भारतीय संघ आता जपानविरुद्ध खेळणार आहे.यजमान जपानने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियावर ३-१ ने विजय साजरा केला. उभय संघ निर्धारित ६० मिनिटात १-१ ने बरोबरीत होते. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताने पहिल्या १५ मिनिटात प्रतिस्पर्धी संघांवर सहावेळा हल्ले केले पण त्याचा काहीही लाभ झाला नाही. चिली संघाने देखील चारवेळा भारताच्या गोलफळीवर हल्ला केला पण त्यांनाही लाभ होऊ न शकल्याने पहिल्या क्वॉर्टरमध्ये गोल होऊ शकला नव्हता.दुसºया क्वॉर्टरच्या तिसºया मिनिटाला चिलीकडून कॅरोलिनाने गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे आश्चर्यचकित झालेल्या भारतीय खेळाडूंनी २२ व्या मिनिटाला बरोबरी साधली. गुरजीतने हा गोल केला. सहा मिनिटानंतर नवनीतने आणखी एक गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. सहा मिनिटांचा खेळ होत नाही तोच गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून आघाडी ३-१ अशी केली.चिली संघाने देखील दोनदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळविली पण त्याचा त्यांना लाभ होऊ शकला नाही. मॅन्युएला उरोजने दुसरा गोल ४३ व्या मिनिटाला केला. भारताची कर्णधार राणी रामपाल हिने ५७ व्या मिनिटाला गोल नोंदविताच आघाडी ४-२ अशी झाली.लालरेमसियानीच्या वडिलांना विजय समर्पित...भारतीय संघाने हा विजय सहकारी खेळाडू लालरेमसियानी हिच्या वडिलांना समर्पित केला. त्यांचे शुक्रवारी निधन झाले. राणीने या युवा स्ट्रायकरची प्रशंसा केली. वडिलांच्या निधनानंतर मायदेशी न परतता लालरेमसियानी हिने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. राणी म्हणाली, ‘लालरेमसियानी हिने आपले वडील गमावले. पण संघासोबत थांबण्याचा निर्णय घेतला. हा विजय त्यांना समर्पित आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. लालरेमसियानीचा खेळ अप्रतिम असून आम्हाला तिच्यावर गर्व आहे. अंतिम फेरी गाठल्याचा सर्व खेळाडूंना आनंद वाटतो.’

टॅग्स :IndiaभारतHockeyहॉकी