यंदाचा मार्च एण्ड ठंडा... ठंडा... कूल-कूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:26+5:302021-04-01T04:30:26+5:30

बांधकाम विभागातही कंत्राटदार हैराण यंदाचाही मार्च एण्ड बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांसाठी असाच गेला. राज्यमार्ग व दुरुस्तीसाठी बख्खळ निधी शासनाने उपलब्ध ...

This year's march and cold ... cold ... cool! | यंदाचा मार्च एण्ड ठंडा... ठंडा... कूल-कूल !

यंदाचा मार्च एण्ड ठंडा... ठंडा... कूल-कूल !

बांधकाम विभागातही कंत्राटदार हैराण

यंदाचाही मार्च एण्ड बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांसाठी असाच गेला. राज्यमार्ग व दुरुस्तीसाठी बख्खळ निधी शासनाने उपलब्ध करून दिला. त्यात हिंगोली जिल्ह्यात फारशी कामे झाली नाहीत. इतर जिल्हामार्ग, प्रजिमा आदींची कामे ४० ते ५० कोटींची झाली तर निधी फक्त ५० लाखांचा असे चित्र होते. सायंकाळी उशिरापर्यंत बीडीएसवर निधी मिळतो का, याची चाचपणी सुरू होती.

जिल्हा नियोजनाचा १०० टक्के खर्च

जिल्हा नियोजन समितीने मात्र यंदा १०० टक्के निधी खर्च केला आहे. १३५ कोटींच्या निधीपैकी एकही रुपया परत गेला नव्हता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी पुनर्विनियोजनातील निधीही त्या-त्या विभागांनी आपल्या विभागाकडे वर्ग करून घेतल्याने चिंता नव्हती. आता कुणी परत करणार तर नाही, याची चाचपणी करीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी नियोजन अधिकारी गजानन पाटील व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कुणीच असा निधी परत न केल्यामुळे जिल्ह्याचा पूर्ण निधी विनियोगात येणार आहे.

Web Title: This year's march and cold ... cold ... cool!