शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण पळून जातात तेव्हा सर्वांचीच उडते धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

हिंगोली: चोर चोरी केल्यानंतर मार मिळेल या भीतीपोटी पळून जातो हे ऐकिवात आहे. पण रुग्ण पळून जातात हे मात्र ...

हिंगोली: चोर चोरी केल्यानंतर मार मिळेल या भीतीपोटी पळून जातो हे ऐकिवात आहे. पण रुग्ण पळून जातात हे मात्र कधी ऐकले नसेल. पण हे सत्य आहे. दोन कोरोना रुग्ण पळून गेले पण पोलिसांच्या मदतीने काही अंतरावरच पकडण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण पुरुष नसून महिला आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून जिल्हा प्रशासनाने बसस्थानक, रेल्वे स्थानक, अण्णाभाऊ साठे वाचनालय आदी ठिकाणी अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. या चाचण्याही सर्वच ठिकाणी होत आहेत. चाचणी केली की लगेच पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह अहवाल आपल्या हातात येतो. यामुळे अनेक जण चाचणी करुन घेताना पहायला मिळत आहेत.

२७ एप्रिल रोजी शहरातील बसस्थानकात दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगोली आणि हट्टा येथील महिला प्रवाशांनी अँटीजन तपासणीसाठी होकार दिला. डॉक्टर मंडळींनी त्यांची अँटीजन तपासणी केली. काही मिनिटातच त्या दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवालाची प्रत त्या कोरोनाबाधीत महिलांना देण्यात आली.

ज्या ठिकाणी अँटीजन तपासणी होत आहे त्या ठिकाणचे काही पॉझिटिव्ह मागच्या आठवड्यात इतरत्र फिरु लागले होते. त्यामुळे तेथे कठडे करण्यात आले आहेत. कोरोना सेंटरची गाडी येईपर्यत ‘त्या’ दोन पॉझिटिव्ह रुग्णांना तेथे बसविले होते. पण काही वेळातच दोन पॉझिटिव्ह महिलांनी तेथून पळ काढत एस. टी. चे आगार गाठले. हा प्रकार बसस्थानक पथकातील डॉ.नाविद अथहर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या दोघींना पकडण्यासाठी पोलिसांना सांगितले.तेव्हा दुपारचे १२.३० वाजले होते. जवळपास एक तास प्रकार बसस्थानकात चालू होता. महिला रुग्ण असल्याने महिला पोलिसांची तसेच होमगार्डची मदत घेण्यात आली. या दोन कोरोनाबाधीत महिलांना लगेच पकडण्यात आल्याने सर्वाचा जीव भांड्यात पडला.

कोरोना पळाले, बसस्थानकात झाली ओरड...

बसस्थानकातील कोरोना रुग्ण पळाले असे बसस्थानकातील प्रवाशांच्या लक्षात येताच सर्वच प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु झाली. जिल्हा प्रशासनाने आवाहन करुनही कधी नाकाला रुमाल न बांधणारे रुमाल बांधू लागले. काही प्रवाशांनी चक्क बसस्थानक सोडून बाहेरच्या हॉटेलचा रस्ता धरला. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. गर्दी होत असल्याचे पाहून पोलिसांनी शिट्या वाजवित गर्दीला सावरले. महिला पोलीस व महिला होमगार्डच्या मदतीने ‘त्या’ कोरोना बाधीत दोन महिला रुग्णांना पकडले अन्‌ लगेच लिंबाळा येथील कोरोना सेंटरला पाठविले.