शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:39 IST

तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.पावसाळा संपत आला तरीही ५५ ते ६० टक्केच सरासरी पाऊस पडला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४३१.९६ मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २७०.८३ दलघमी एवढा आहे. जुलै महिन्यात नांदेडसाठी १.७३९१ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. या धरणातून विदर्भातील ४० कळमनुरी तालुक्यातील २५ गावांना व कळमनुरी शहर अशा एकूण ६६ गावांना या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. उन्हाळी हंगामातच पिकांसाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. जून महिन्यांपासून हे दोन्ही कालवे बंद आहेत. कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत ५२३.९ मि.मी.च पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ७२ टक्के धरण रिकामेच आहे. कडक ऊन व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने आटते. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरण काही भरत नाही. ८ महिन्यात धरणातील साठा कमी होईल, असे वर्तविण्यात येत आहे. धरणातून दरवर्षी पिके व पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. पाऊस नसल्याने धरण काही भरत नाही. धरणात येणारी पाण्याची आवक कमीच होत चालली आहे.

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोली