संचारबंदीचे उल्लंघन, शाळेला १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:49+5:302021-04-09T04:31:49+5:30

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून हिंगोलीतील सिक्रेट हार्ट इंग्लिश स्कूलमध्ये पालक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. ...

Violation of curfew, school fined Rs 10,000 | संचारबंदीचे उल्लंघन, शाळेला १० हजारांचा दंड

संचारबंदीचे उल्लंघन, शाळेला १० हजारांचा दंड

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून हिंगोलीतील सिक्रेट हार्ट इंग्लिश स्कूलमध्ये पालक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ एप्रिल रोजी सकाळी बाळू बांगर, बी. के. राठोड देवीसिंग ठाकूर, गजानन हिरेमठ, माधव सुक्ते, कपिल धुळे, माधवसिंग ठाकूर, नागेश नरवाडे, चव्हाण यांच्या पथकाने जाऊन पाहणी केली असता कोरोना प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने शाळेला १० हजारांचा दंड ठोठावून तो वसूल करण्यात आला.

हिंगोली शहरातील विविध भागात नगरपालिकेच्या पथकांनी आज विनामास्क फिरणा-या लोकांवरही कारवाई केली. त्याचबरोबर निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना समज देण्यात आली. काही व्यापाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. तरीही पथक माघारी फिरल्यानंतर अनेकांनी पुन्हा अर्धे शटर वर करून दुकाने सुरू केल्याचे पाहायला मिळाले. अशा लोकांवर मात्र कोणताच वचक नसल्याचे दिसून आले.

.............

शाळेचे नाव सॅक्रेड की सिक्रेट?

Web Title: Violation of curfew, school fined Rs 10,000