बेवारस वाहनांनी पोलिसांचा वाढवला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:10+5:302021-03-07T04:27:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गंत जानेवारी २०२१ अखेर एकूण २०३ बेवारस वाहनांची नोंद झाली आहे. या ...

Unattended vehicles increased police stress | बेवारस वाहनांनी पोलिसांचा वाढवला ताण

बेवारस वाहनांनी पोलिसांचा वाढवला ताण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गंत जानेवारी २०२१ अखेर एकूण २०३ बेवारस वाहनांची नोंद झाली आहे. या वाहनांची ओळख पटल्यास मूळ कागदपत्रे सादर करून ही वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे. जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेंतर्गंत पोलिसांना जानेवारी २०२१ अखेरपर्यंत २०३ वाहने आढळली आहेत. यात यामाहा कंपनीच्या ४ दुचाकी, टीव्हीएस ९, सुझुकी ०८, हिरोहोंडा ९७, हिरो २२, होंडा ०८, बजाज ४६, रॉयल इनफिल्ड १, इतर कंपनीच्या ७ दुचाकींचा समावेश आहे. तसेच महिंद्रा कंपनीची १ जीप अशा एकूण २०३ वाहनांचा समावेश आहे. या सर्व बेवारस वाहनांसंदर्भातील माहिती हिंगोली पोलिसांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे. वाहनाची ओळख पटल्यास वाहनाच्या मूळ कागदपत्रांसह स्थानिक गुन्हे शाखेशी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.

Web Title: Unattended vehicles increased police stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.