तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:52 PM2020-04-23T16:52:10+5:302020-04-23T16:54:58+5:30

औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील घटना

Two brothers drown in lake at Hingoli | तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

googlenewsNext

जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील गावाजवळील तलावात दोन सख्खे भाऊ पोहण्यासाठी गेले होते. या दोन्ही भावंडाचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. 

औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील पोहण्यासाठी गेलेल्या सर्जेराव गणेश नाईक (१२) धूरपत गणेश नाईक (८) हे  दोघे सख्ख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ या दोघांना एका खाजगी वाहनाने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

परंतु डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. दोन्ही बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी  सपोनी गजानन मोरे, बालाजी जाधव, जीवन गवारे, शेख मदार, सय्यद शायद आदींनी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: Two brothers drown in lake at Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.