शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांच्या मालकांना वाहतूक शाखेची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 10:53 IST

शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

हिंगोली : शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी एका व्हिडीओद्वारे मोकाट गुरांच्या मालकांना गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून राज्यभरात त्याचे कौतुक होत आहे.हिंगोली शहरात जवळपास पाचशेवर मोकाट जनावरे आहेत. गतवर्षी पालिकेने या जनावरांना कोंडवाड्यात कोंडले होते. तेव्हा सदरील पशुपालकांनी जनावरांना सोडविण्यासाठी पालिकेकडे धाव घेतली होती. परंतु दंड आकारुन या जनावरांना सोडून देण्यात आले. यातील निम्मी जनावरे मोकाट असल्याने त्यांना सोडविण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे पालिकेने या जनावरांचा काही दिवस सांभाळ करुन त्यांना पुन्हा शहरात सोडून दिले होते. या पशुपालकांवर कडक कारवाई न केल्याने त्यांनी पुन्हा ती जनावरे शहरात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह भाजी विक्रेते, व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ही तर न.प.ची जबाबदारीसदरील पशुपालकांनी आपापली जनावरे ताब्यात न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या व्हिडीओद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पशुपालकांचे धाबे दणाणले आहेत. या जनावरांच्या मालकांची माहिती नसल्यामुळे या व्हिडीओद्वारेच नोटीस देत असल्याचे चिंचोलकर यांनी म्हटले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र पालिकेने या बाबतीत हात झटकले आहेत. या जनावरांच्या मालकांची यादी पोलिसांना देण्यास पालिका विलंब करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. ही जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघात होतात. वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. पोलीस मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करु शकतात, हे अनेकांना माहित नाही. या व्हीडीओद्वारे जनावरांच्या मालकांना माहिती दिली आहे.  जनावरांच्या मालकांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. तरीही जनावरे रस्त्यावर दिसून आल्यास संबंधितांविरूद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील. - ओमकांत चिंचोलकर, सपोनि वाहतूक शाखा, हिंगोली