सर्व दुकाने उघडण्यास परवानगीची व्यापारी संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:16+5:302021-03-09T04:33:16+5:30

वसमत ,सेनगाव, कळमनुरी, औंढा या तालुक्यातील रुग्णाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हिंगोली शहरात मात्र मोठ्या संख्येने रुग्ण ...

Trade unions demand permission to open all shops | सर्व दुकाने उघडण्यास परवानगीची व्यापारी संघटनांची मागणी

सर्व दुकाने उघडण्यास परवानगीची व्यापारी संघटनांची मागणी

वसमत ,सेनगाव, कळमनुरी, औंढा या तालुक्यातील रुग्णाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हिंगोली शहरात मात्र मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत; मात्र याकरिता संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार बंद केल्याने जिल्ह्याचे अर्थचक्र ठप्प झालेले आहे, तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद केलेले आहेत. या पूर्वीच्या कोरोना काळामध्ये अटी व शर्ती टाकून जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने चालू होते. ज्यामुळे मागणी व उत्पादन बरोबर चालत होते; परंतु आता संपूर्ण उद्योगपण बंद केल्याने ही साखळीच तुटत आहे. तर त्यात काम करणारे शेकडो कुटुंब अडचणीत सापडलेले आहेत, असे म्हटले. कोराेनाविषयक विविध सूचना पालनाच्या कठोर अटी टाकून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. एक निवेदन माजी आ.गजानन घुगे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. तर दुसरे निवेदन नंदकिशोर तोष्णीवाल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराणा, अनिल नेनवाणी, गजेंद्र बियाणी, सुमित चौधरी आदींनी दिले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाविषयक सर्व नियम पाळण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले आहे. आज किती रुग्ण आढळतात, हे पाहून व्यापाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेतला जाईल.

Web Title: Trade unions demand permission to open all shops