शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटले; रस्त्यावर उलटल्यानंतर पेट घेतल्याने वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 20:36 IST

भररस्त्यावर ट्रक पेटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. 

- रमेश कदमआखाडा बाळापूर: नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूरनजीकच्या पिंपरी फाटा येथे लाकडे वाहून नेणारा ट्रक उलटला. उटलेल्या ट्रकला काही वेळातच आग लागली. त्यात लाकडे असल्याने रस्त्यावरील आग भडकली. यानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.

नांदेड येथून निघालेला ट्रक हिंगोलीकडे जात होता. (आयशर पिक अप क्र.एम. एच. 17 की 5935 ) सायंकाळी ७:२० मिनिटाच्या सुमारास पिंपरीफाटा येथे अचानक ट्रकचे टायर फुटले. मोठा आवाज होवून ट्रक रस्त्यावरच उलटला. ट्रक उलटल्यानंतर त्यातील चालक रसूल खान सिकंदर खान पठाण या.हिंगोली व क्लिनर शेख हानिफ शैख लाल रा. गारमाळ ता. जि‌. हिंगोली यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात क्लिनरला गंभीर दुखापत झाली. तेवढ्यात रस्त्यावरच ट्रकने पेट घेतला. आत लाकडे असल्याने आग वेगाने भडकली. भररस्त्यावर ट्रक पेटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. 

दरम्यान, माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग वाहतूक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खोंडकर, पोलीस जमादार सोपान थिटे , गजानन ढाले, सचिन खूटे , प्रवीण राठोड तातडीने घटनास्थळी पोहोचले .जखमींना मदत केली. त्यांनी कळमनुरी येथील अग्नीशामक दलाला पाचारण केले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाला यश आले. जखमी क्लिनरला बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बाळापुर नजीक ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग