The speedy truck crushed the couple on the bike; Husband killed on the spot | भरधाव ट्रकने दुचाकीवरील दांपत्यास उडवले; पती जागीच ठार

भरधाव ट्रकने दुचाकीवरील दांपत्यास उडवले; पती जागीच ठार

ठळक मुद्देगंभीर जखमी महिलेस उपचारासाठी नांदेडला हलविले

आखाडा बाळापूर : नांदेड- हिंगोली महामार्गावरील कामठा फाटा येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एका दुचाकीस उडवले. यामध्ये दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. यात पती जागीच ठार झाला आहे असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले असून पतीचा मृतदेह बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड- हिंगोली रोड वरील कामठा फाटा येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. दुचाकीस्वार हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान गावचे रहिवासी असून ते दुचाकीवरून ( क्रमांक एम. एच. 26 जे- 3089 ) पत्नीसह  हिंगोलीकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( क्रमांक एम. पी. 09  एच.जी. 2434 ) दुचाकीस जोराची धडक दिली. 

यात दुचाकीस्वार राजकुमार बसप्पा कुराडे (वय 42 वर्ष रा. लहान, तालुका अर्धापूर ) हा जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी चंचलाबाई राजकुमार कुराडे (वय 38 वर्ष ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार दादाराव सूर्य यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी जखमी महिलेस तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना केले. तर मयताचा मृतदेह आखाडा बाळापुर ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: The speedy truck crushed the couple on the bike; Husband killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.