शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी घरटी तयार करणारा सर्पमित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

हिंगोली : सर्पमित्र कधी पक्षीमित्र होऊ शकत नसतो, असे म्हणतात, पण पक्षी पाण्यावाचून तडफडू लागल्याचे पाहून सर्पमित्राने फेब्रुवारीच्या पहिल्या ...

हिंगोली : सर्पमित्र कधी पक्षीमित्र होऊ शकत नसतो, असे म्हणतात, पण पक्षी पाण्यावाचून तडफडू लागल्याचे पाहून सर्पमित्राने फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाचशे घरटी तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. तयार केलेली घरटी अनेकांना नि:शुल्क देण्यात येणार आहेत.

यशवंतनगरातील सर्पमित्र मुरली कल्याणकर हा व्यवसायाने पिठाची गिरणी चालक आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पिठाच्या गिरणीवर पत्नीसह दोन चिमुकल्यांचे पोट भरत नाही, म्हणून कर्ज काढून गाडी घेतली, परंतु दोन वर्षांपासून ती कोरोनामुळे धूळखात पडूनच आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. पक्षी अन्न, पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. पक्ष्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार करून सुरुवातीला ५ किलो धान्य बसणारी दोन डब्बे विकत घेतली अन् कामाला सुरुवात केली. तयार केलेले डब्बे चांगले झाल्याचे पाहून दोन पक्षीप्रेमींनी लगेच नेली. मग काय मुरलीचा उत्साह वाढला. आजमितीस त्याने बघता-बघता ५० घरटे स्वत: खर्च करून पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्यांस दिले आहेत.

मला काहीच कमवायचे नाही

माणसाचे आयुष्य खूप कमी आहे. मी सर्पमित्र असलो, तरी पक्षीही माझ्यासाठी तितकेच प्रिय आहेत. दुसरे आवर्जून सांगायचे असे की, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे वन्य जिवांवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे पक्ष्यांसाठी तयार केलेले घरटे त्यांनाही देणार आहे. त्यांच्या अंगणातील झाडांवर हे घरटे बांधणार असून, पक्षी पाणी पिताना पाहणार आहे. हात चालेल तोपर्यंत हे काम मी चालूच ठेवणार आहे. या कामात पत्नी सुरेखा, मुलगा कार्तिक, मुलगी मयूरी मदत करत आहेत, असे मुरलीने सांगितले.

फोटो नंबर ३