मोफतच्या धान्यासाठीही चालान भरण्यासाठी दुकानदारांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:40+5:302021-05-06T04:31:40+5:30

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, ...

Shopkeepers displeased to pay invoices even for free grain | मोफतच्या धान्यासाठीही चालान भरण्यासाठी दुकानदारांची नाराजी

मोफतच्या धान्यासाठीही चालान भरण्यासाठी दुकानदारांची नाराजी

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, त्यांना मोफत धान्याच्या लाभार्थींचे धान्य मोफतच पुरवावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटेनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती म्हणाले, सगळीकडेच चालान भरून धान्य मिळाले असते तर कदाचित भविष्यात रक्कम परत मिळेल, या आशेने दुकानदार चालान भरायला तयार झाले असते. मात्र शेजारच्या जिल्ह्यातच चालान भरून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक दुकानदार यावरून नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत प्रशासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत.

४३६० मे.टनाचे मासिक नियतन मंजूर

प्रधानमंत्री गरीब कल्याणचा अंत्याेदयचे १ लाख ३७ हजार ६८४, तर प्राधान्य कुटुंबातील ७ लाख ३४ हजार ९२ सदस्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी गहू २,५७६ तर तांदूळ १,७८४ मे.टन एवढे मासिक नियतन मंजूर झालेले आहे.

नियमित व मोफत दोन्हींचाही लाभ

मे व जून या दोन महिन्यांसाठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार वाटप त्या त्या महिन्यात करावे, तसेच गरीब कल्याणमधील मंजूर नियतनानुसार मोफत अन्नधान्याचे वाटप करावे, असे आदेशात म्हटले आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्थलांतरितांनाही पोर्टेबिलिटी अंतर्गत अन्नधान्याचे वाटप करावे. जसे अंत्योदयमध्ये अन्नसुरक्षा योजनेत अनुज्ञेय असलेल्या ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर या शिधापत्रिकाधारकास सदस्यसंख्येनुसार प्रतिसदस्य ५ किलाे याप्रमाणे अन्नधान्य वितरित करायचे आहे. प्राधान्य कुटुंबांनाही असेच नियमितसह मोफतचा लाभ द्यावयाचा आहे.

Web Title: Shopkeepers displeased to pay invoices even for free grain