शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘यू-डायस प्लस’मध्ये भरावी लागणार शाळांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

हिंगोली : भारत सरकार व नीती आयोगाकडून निर्देशांक निश्चित करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या ...

हिंगोली : भारत सरकार व नीती आयोगाकडून निर्देशांक निश्चित करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या शाळांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली ऑनलाइन पद्धतीने कार्यन्वित करण्यात आली असून, यामध्ये शाळांची माहिती १५ मेपर्यंत भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या अभ्यासक्रमाच्या अनधिकृत, मान्यता असलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास सादर करण्यात येते. त्यानुसार सन २०१८-१९ या वर्षापासून सर्व शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम झालेल्या ‘यू-डायस प्लस’ महितीनुसार भारत सरकारकडून पीजीआय निर्देशांक व निती आयोगाकडून एसईक्यूआय निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शाळांच्या माहितीचा उपयोग शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आदी शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता उपयोगात येणार आहे, तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीही महत्त्वाची ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मुख्याध्यापकांना करावी लागणार माहिती प्रमाणित

यू-डायस प्लस प्रपत्र ऑनलाइन भरण्यासाठी नवीन शाळेला यू-डायस क्रमांक मिळण्यासाठी http://udiseplus.gov.in ही वेबसाइट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टरवरून घ्यावी लागणार आहे, तसेच सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनीच लिहिणे व प्रमाणित करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. प्रपत्र केंद्रप्रमुखाकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांना हे प्रपत्र चार दिवसांच्या आत पूर्णपणे भरून केंद्रप्रमुखाकडे सादर करावे लागणार आहे. कार्यरत शिक्षकांची माहिती ही त्याच्या सर्व्हिस बुकवरून घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी १३३० शाळांची भरली होती माहिती

२०१९-२० या शैक्षणिक वर्षातील माहिती यू -डायस प्लस या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. यात १ हजार ३३० शाळा, २ लाख ३९ हजार ६४४ विद्यार्थी तर ८ हजार ७४७ शिक्षकांची नोंद झाली होती. आता १५ मे पर्यंत मुख्याध्यापकांनी ही माहिती भरणे बंधनकारक आहे. तसेच तालुकास्तरावर २० मे, जिल्हा स्तरावर २५ मे तर राज्य स्तरावरील माहिती ३१ मे पर्यंत भरली जाणार आहे.

यू -डायस प्लस मध्ये विद्यार्थी, शिक्षक, वर्गखोल्यासह इतर माहिती अचूक व वस्तूनिष्ठ भरावी. शालेय शिक्षण आराखड्यासाठी माहिती उपयुक्त असून शाळांना निधी उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.

-संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी, (प्रा.)