शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ...

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे हे योग्य नसल्याचे उपक्रमशील शिक्षक देवीदास गुंजकर यांनी सांगितले

एरवीही मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळांकडून वर्षभर केले जाते. अंतिम परीक्षांतही त्याच प्रमाणात गुण असतात. मात्र, ऑनलाईन परीक्षा घेणेही सर्व शाळांना शक्य होईल, असे वाटत नाही. त्यासाठीचे साहित्य सर्वांकडे राहील, हे सांगता येत नाही. परीक्षा घेतल्या पाहिजे मात्र तांत्रिक उपलब्धतेचे काय? अशी प्रतिक्रिया माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.

मुलांसाठी परीक्षा आवश्यक आहेत. त्याचआधारे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा, हे आमचे म्हणणे आहे. यासाठी उत्तरपत्रिका घरी पाठवून ऑनलाईन पेपर देऊन ठराविक वेळेत शाळेत आणून पालकांनी जमा केल्यास व कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी न करता या उत्तरपत्रिका सादर केल्यास शक्य आहे, असे शिक्षण संस्थाचालक दिलीप बांगर म्हणाले.

सध्याच्या कोरोनाच्या काळात परीक्षेला मुलांना पाठविणे अवघड आहे तर ऑनलाईन परीक्षा सर्वच शाळा घेतील, असे नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतली तर चांगलेच आहे. त्यामुळे पालकांना मुलाची गुणवत्ता कळेल.

-दिनकर पिसे, पालक

विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा बोनस न देता ऑनलाईन पद्धतीने काही ना काही परीक्षा घेतली पाहिजे. त्यामुळे निदान मुले अभ्यास तरी करतील. सध्या ऑनलाईन अभ्यासात मुले काय करताहेत हे आधीच कळायला मार्ग नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शक्य नसल्या तरीही ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.

-अजय बियाणी, पालक

पहिली २२८५२

दुसरी २३१८७

तिसरी २२१९२

चौथी २१८७४

पाचवी २१३४२

सहावी २०७४०

आठवी २०५३५

नववी १९५१९

अकरावी१२६५७

सर्वाधिक मुले दुसरीत २३१८७

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२०५८५२