शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांतच अडकले १०३२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या ५०११ विद्यार्थ्यांनी गतवर्षी नोंदणी केली होती. यापैकी ४१३९ जणांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी मंजूर केली होती. यंदा ...

हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या ५०११ विद्यार्थ्यांनी गतवर्षी नोंदणी केली होती. यापैकी ४१३९ जणांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी मंजूर केली होती. यंदा मात्र ३७३३ जणांचेच अर्ज आतापर्यंत आले आहेत. यापैकी ९०० अर्ज महाविद्यालय, तर १९० अर्ज समाजकल्याणच्या स्तरावर प्रलंबित आहेत. इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्गातील ४०१७ जणांना गतवर्षी शिष्यवृत्ती मिळाली होती. यंदा यातही ३३८१ अर्ज आले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील मिळून हजारावर अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत. जिल्हाधिकऱ्यांच्या स्वाक्षरीच्या नोटिसा देऊनही अनेक महाविद्यालये यात गंभीर नाहीत.

जिल्ह्यातील महाविद्यालये १५२

एकूण प्रलंबित अर्ज १०३२

इतर मागास, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग ६२६

अनुसूचित जाती प्रवर्ग ४०६

तर महाविद्यालयांवर कारवाई

याबाबत सहायक समाजकल्याण आयुक्त शिवानंद निमगिरे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची पत्रे देऊन महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे अर्ज मुलांकडून भरून घेण्यास सांगितले होते. तरीही ते प्रलंबित आहेत. आणखी दोन दिवसांत ऑनलाईन अर्ज केला तर या मुलांना शिष्यवृत्ती देता येईल. यासाठी महाविद्यालयांनी कॅम्प लावावेत. विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालयांवर कारवाई होईल.