रामेश्वर तांडा येथील चार हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:31+5:302021-04-12T04:27:31+5:30

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे हातभट्टी दारू काढली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सपोनि. रवी ...

Raid on four distilleries at Rameshwar Tanda | रामेश्वर तांडा येथील चार हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा

रामेश्वर तांडा येथील चार हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे हातभट्टी दारू काढली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सपोनि. रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. एच.डी. नकाते, पाहेकॉ नागोराव बाभळे, संजय मार्के, पोशि चव्हाण, गृहरक्षक दलाचा जवान गायकवाड यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी रामेश्वर तांडा येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी अविनाश शिवराम जाधव, उषा गणेश जाधव, कमल सोमला चव्हाण, रामराव शंकर जाधव यांच्याकडे १३० लिटर मोहफुलाचे सडके रसायन, ३० लिटर हातभट्टी दारू असा २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सडके रसायन नष्ट केले असून, याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.

Web Title: Raid on four distilleries at Rameshwar Tanda