शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात प्रधानमंत्री आवास कक्षास कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:14 IST

येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाला सत्ताधाऱ्यांनी कुलूप ठोकल्यामुळे येथील लाभार्थ्यांची कामे खोळंबली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाला सत्ताधाऱ्यांनी कुलूप ठोकल्यामुळे येथील लाभार्थ्यांची कामे खोळंबली आहेत. आचारसंहितेपूर्वी न.पं. कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास या लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास विलंब होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी या विभागाला कुलूप लावल्याने प्रशासन व लाभार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.औंढा येथील नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७९१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यातील २५० लाभार्थ्यांना नगरपंचायतीकडून बांधकामाचे कार्यारंभ आदेश दिल्याची न.पं.कडे नोंद आहे. त्यातील ५२ घरकुल लाभार्थ्यांना कुठल्याच पदाधिकारी व गटनेत्यांना विश्वासात न घेता पहिला हप्ता वाटप केल्याने न.पं.तील पदाधिकारी नाराज झाले. त्यांनी एकत्र येऊन न.पं.च्या घरकुल विभागातील कर्मचारी व मुख्याधिकाºयांवर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत कुलूप ठोकले आहे. आज या घटनेला पाच दिवस लोटूनहीे कुलूप काढण्यास कोणत्याही पदाधिकारी व अधिकाºयाने पुढाकार घेतला नाही. सदरील प्रकरण सध्या जिल्हाधिकाºयांच्या कोर्टात गेले आहे. चौकशी करून कारवाईची मागणी सत्ताधाºयांनी केली आहे. आज ज्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले त्यांनी स्वत:जवळील पैसे खर्च करून बांधकाम सुरू केले आहे. असे असले तरी अजून काही घरकुल लाभार्थ्यांना कार्यारंभ नसतानाही त्या प्रभागातील नगरसेवकांच्या सगण्यावरून काम सुरू केले. त्यामुळे हे लाभधारक नगरसेवकाला जाब विचारत आहेत. त्यामुळे न.पं. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. असे असलेतरी काही नगरसेवक यांनी स्वत:कडे बांधकामाचे कार्यारंभ आदेश ठेवल्याचेही सांगितले जातआहे. सध्या कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवू शकते. त्यामुळे लाभार्थी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी न.पं.च्या घरकुल विभागात चकरा मारीत आहेत. तसेच ज्यांचे काम प्रगतीपथावर आहे, आशांना या विभागात प्रोग्रेस रिपोर्ट देण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने ही सर्वच कामे रखडली आहेत.पाच दिवस उलटूनही कुलूप उघडेनाया बाबत न.पं. चे मुख्यधिकारी निशिकांत प्रचंडराव म्हणाले, शहरात घरकुल योजनेतंर्गत दोन डीपीआर मंजूर आहेत. यातील पहिला १४६ घरकुलांसाठी तर दुसरा ६४५ घरकुलासाठी डीपीआर मंजूर झाला आहे. यापैकी १४६ घरकुलासाठी मंजूर झालेली यादी डीपीआरमधून नगरपंचायतीच्या वतीने ५२ घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली. सर्वांना नियमानुसारच पहिला हप्ता वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.सत्ताधारी किंवा इतर मात्र या प्रश्नावर बोलायला तयार नसून प्रशासनाच चूक असल्याचे सांगत आहेत. प्रशासन नियमावर बोट दाखवत आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागTahasildarतहसीलदार