शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

दसरा महोत्सवाची तयारी जोरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:34 IST

येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. या महोत्सवाची मंद गतीने सुरू असलेली तयारी आता गतिमान झाल्याचे दिसत आहे.हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर दरवर्षी दसरा महोत्सव मोठ्या थाटात भरतो. यंदा मात्र दसरा महोत्सवाच्या तयारीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे हा परिणाम होत होता. आधीच प्रशासनाला निवडणुकीची कामे मोठ्या प्रमाणात असतात. त्यात हा महोत्सव हाताळायचे म्हणजे अवघडच काम आहे. त्यामुळे खाकीबाबा मठाचे महंत व शहरवासीयांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र पाळण्यांसह इतर बाबींच्या निविदांना विलंब झाला. त्या काढल्या तर वाटाघाटीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे हे पाळणे येणार की नाही, याची शंका होती. मात्र यातील वाटाघाटी यशस्वी झाल्याने आता पाळणेही येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रदर्शनीची उभारणी करण्याच्या कामाला फारसी गती नव्हती. मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी सातत्याने या कामाच्या ठिकाणी भेटी देत आहेत. त्यामुळे या कामालाही आता गती येत असल्याचे दिसत आहे. इतर अधिकारीही या ठिकाणी भेटी देत आहेत. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व इतरांनीही येथे भेटी दिल्या.आज पाळण्यांचे कामही सुरू करण्यासाठी साहित्य येवून पडले आहे. त्यामुळे हे कामही आजपासून सुरू होणार असल्याचे दिसत आहे. दुपारच्या वेळी या पाळण्यांचीही लगबग दिसून येत होती. त्यामुळे आतापर्यंत दसरा महोत्सव यंदा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आता हे काम सुरू झाल्याने विश्वास बसणार आहे.२९ रोजी रामजन्मोत्सव२९ रोजी रोजी दुपारी १२ वाजता हिंगोली येथील बद्रीनारायण मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणेच २९ रोजी दुपारी ४ वाजता रामलीला मैदानावरून श्री हनुमानजींची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.दसरा प्रदर्शनी तसेच प्रदर्शनीतील दुकाने, आकाश पाळण्यांचा लिलाव झाला आहे. मोठा आकाश पाळणाचे कंत्राट १७ लाख ५१ हजार रूपयांना दिले आहे. तर लहान आकाश पाळणा २ लाख २५ हजार रूपये, हॉटेल व पानटपरी १ लाख ३१ हजार, प्रदर्शनी ६ लाख ५० हजारास दिली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकHingoliहिंगोली