केंद्रा खुर्द ते नागटेक रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST2020-12-24T04:26:36+5:302020-12-24T04:26:36+5:30

केंद्रा खुर्द पाटी - केंद्रा बुद्रूक - नागटेक या रस्त्याची दुरवस्था ५ वर्षांपासून कायम आहे. पडलेल्या खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम ...

Poor condition of Kendra Khurd to Nagtek road | केंद्रा खुर्द ते नागटेक रस्त्याची दुरवस्था

केंद्रा खुर्द ते नागटेक रस्त्याची दुरवस्था

केंद्रा खुर्द पाटी - केंद्रा बुद्रूक - नागटेक या रस्त्याची दुरवस्था ५ वर्षांपासून कायम आहे. पडलेल्या खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकत वेळ साधली जात असे. यानंतर या रस्त्याच्या कामासाठी लाखाे रूपयांचा निधी मंजूर करून प्राथमिक कामाला सुरूवात झाली हाेती. मात्र या रस्त्यावर दाेन वर्षांत केवळ गिट्टी व बाजूला मुरूम टाकून पुढील काम बंद आहे. यामुळे या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची माेठी गैरसाेय हाेत आहे. तसेच टाकलेली गिट्टी अनेक ठिकाणी उखडली जात असून पुन्हा रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ हाेत आहे. यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला संपर्क साधला असता संपर्क हाेऊ शकला नाही. तरी हा रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांतून हाेत आहे. फाेटाे नं.११

Web Title: Poor condition of Kendra Khurd to Nagtek road