रस्त्यांवर खड्डे : वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST2021-03-07T04:27:12+5:302021-03-07T04:27:12+5:30

‘द्राक्षांची काढणी वेळेवर करावी’ हिंगोली: जिल्ह्यातील फळ उत्पादकांनी लागवड केलेल्या द्राक्षांच्या घडांची काढणी वेळेवर करावी. काढणीनंतर द्राक्ष योग्य ठिकाणी ...

Pits on roads: Drivers suffer | रस्त्यांवर खड्डे : वाहनचालक त्रस्त

रस्त्यांवर खड्डे : वाहनचालक त्रस्त

‘द्राक्षांची काढणी वेळेवर करावी’

हिंगोली: जिल्ह्यातील फळ उत्पादकांनी लागवड केलेल्या द्राक्षांच्या घडांची काढणी वेळेवर करावी. काढणीनंतर द्राक्ष योग्य ठिकाणी ठेवावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.

भाजीपाल्यावर अळीचा प्रादुर्भाव

हिंगोली: जिल्ह्यात लागवड केलेल्या भाजीपाल्यावर नागअळी, पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यावर त्वरित फवारणी करावी. सायांट्रॅनिलीप्रोले १०.२६ टक्के १८ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाल्याची काढणीही योग्य वेळीच करावी, असे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे.

डांबर बनले धोकादायक

हिंगोली: नांदेड नाका ते उड्डाणपुलापर्यंतचा रस्ता काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला आहे. परंतु, काही ठिकाणी रस्त्यावर डांबर जास्तीचे पडल्याने दुपारच्यावेळी रखरखत्या उन्हात वाहनचालकांना वाहने चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन डांबरावर गिट्टीची चुरी टाकावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

Web Title: Pits on roads: Drivers suffer