शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

कीड नियंत्रणास सर्वेक्षक नेमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:35 PM

सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकावर वारंवार कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनात घट होऊ नये, यासाठी कीडरोग सर्वेक्षण, व्यवस्थापन प्रकल्प क्रॉपसॅप २००९-१० पासून २०१७-१८ पर्यंत संस्थेमार्फत कीड सर्वेक्षक नेमून सर्वेक्षण करण्यात येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकावर वारंवार कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनात घट होऊ नये, यासाठी कीडरोग सर्वेक्षण, व्यवस्थापन प्रकल्प क्रॉपसॅप २००९-१० पासून २०१७-१८ पर्यंत संस्थेमार्फत कीड सर्वेक्षक नेमून सर्वेक्षण करण्यात येत होते.२०१८-१९ पासून सदर प्रकल्प सर्व क्षेत्रीय कर्मचाºयांच्या सहभागाने मोबाईल अ‍ॅपद्वारे किडरोगाची निरीक्षणे नोंदवून एनआयसी पुणे व कृषी विद्यापीठास अहवाल सादर करून अ‍ॅडव्हायजरी शेतकºयांपर्यंत पोहोचविली जात आहे. जिल्ह्यात नियमित सर्वेक्षणासाठी १४ मंडळ कृषी अधिकारी सज्जे, २८ कृषी पर्यवेक्षक व १६८ कृषी सहायकांचे रजिस्ट्रेशन केले असून नियमित सर्वेक्षण होत आहे.कापूस- नियमित सर्वेक्षणामध्ये कापूस पिकामध्ये शेंदरी बोंडअळी पतंग कोषावस्थेतून बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत एक किंवा दोन गावांत मोठ्या प्रमाणावर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी निवड केली. फुलोरा अवस्था येण्यापूर्वी हे पतंग कामगंध सापळ्यात पकडून मारल्यास त्यांचे प्रजनन कमी होऊन किडीच्या संख्येवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य आहे. फुलोरा, पाते अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल.कामगंध सापळ्याचा वापर एकरी ८ सापळे पिकापेक्षा १ फूट उंचीवर लावावेत. दर ६० दिवसांनी सापळ्यातील ल्यूर बदलणे आवश्यक आहे. ३ दिवस ८ पतंग सापळ्यात आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजून ३५ ते ४५ व्या दिवशी पाते फुले अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबीनवर सुरूवातीला पेरणी झालेल्या भागात पाने खाणारी उंटअळी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे. अळीसाठी क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मि.ली. किंवा इन्डोक्झाकार्ब १५.८ ईसी ७ एमएल १० लिटर पाण्यातून फवारावे. चक्रीभुंग्यासाठी ट्रायझोफॉस ४० ईसी १२ मि.ली. किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १५.५ एस.सी ३ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक व्ही.डी. लोखंडे व उपविभागीय अधिकारी एस.बी. कच्छवे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी