शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोविड सेंटरला देयकांच्या ऑडिटचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या वापरावर मर्यादा रहाव्यात, रुग्णांची लूट होऊ नये, यासाठी या खासगी कोविड सेंटरधारकांना विविध मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या ...

ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या वापरावर मर्यादा रहाव्यात, रुग्णांची लूट होऊ नये, यासाठी या खासगी कोविड सेंटरधारकांना विविध मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या होत्या. यामध्ये डॉक्टरांच्या ड्युटीपासून ते इतर सुविधांबाबतची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयात दर महिन्यात दाखल झालेल्या रुग्णांची एकूण संख्या व तेवढ्यांना दिलेली देयके ही माहितीही सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप कुणीच ही माहिती सादर केली नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. तर देयकांबाबत काही तक्रार असेल तर नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातच गणेश सोळंके यांच्याकडे तक्रार नोंदवायची होती. मात्र, तशी कुणाची लेखी तक्रारही आली नाही. अनेकजण बाहेर तोंडी ओरड करीत असले तरीही खासगी रुग्णालयांनी अवाजवी देयक आकारून तेवढ्या रकमेचे देयक न दिल्याची तक्रार काही नोंदविली गेली नाही.

नोटिसा देणार

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन या रुग्णालयांनी करणे गरजेचे आहे. दर महिन्याच्या पाच तारखेला देयके सादर करणे बंधनकारक असून पाच दिवस जास्तीचे लोटले तरीही देयके आली नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने संबंधितांना नोटिसा देण्यात येतील.

अशी आहेत रुग्णालये

महेश कोविड हेल्थ सेंटर हिंगोली ३० बेड, नाकाडे कोविड हेल्थ सेंटर हिंगोली २५ बेड, आयकॉन कोविड हेल्थ सेंटर हिंगोली ३०, माऊली कोविड हेल्थ सेंटर हिंगोली २०, तिरुमला कोविड हेल्थ सेंटर हिंगोली २०, शिवम कोविड हेल्थ सेंटर १५, पतंगे कोविड हेल्थ सेंंटर वसमत १७, सातपुते कोविड हेल्थ सेंटर २०, विवेकानंद कोविड हेल्थ सेंटर वसमत २०, द्वारका हॉस्पिटल हिंगोली २५, जगदंब हॉस्पिटल हिंगोली ४० अशी २८२ रुग्णक्षमतेची १२ रुग्णालये आहेत. १० रोजी या ठिकाणी ऑक्सिजनवरील ९० तर विनाऑक्सिजनचे ६९ रुग्ण दाखल होते. तर ९० ऑक्सिजन बेड रिकामे होते.