शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्‍यात ८५ हेक्‍टरवर फळबाग लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत ...

कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत तालुक्यात ८५.१० हेक्‍टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा ,लिंबू ,पेरू आदी फळबाग पिके ६५ लाभार्थ्यांनी ५० हेक्‍टरवर लावली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा, पेरू, आदी फळबाग पिके ४८ शेतकऱ्यांनी ३५.१० हेक्टरवर लावली आहेत. यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात रब्बीचे ३६ हजार ६८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १५२.२४ हेक्‍टरवर झालेली आहे. तालुक्‍यात हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्‍टर असून, ४० हजार ६५६ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १९९.४६ हेक्टरवर झालेली आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ११०.५९ टक्के आहे. या हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रब्बीचा पेरा वाढलेला आहे. गहू व हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र वाढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी दिली.

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

मागील आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी या अळीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. पूर्ण वाढलेल्या रोपांची संख्या सरासरी चौरस मीटर क्षेत्रात दोन-तीन अळ्या आढळल्यास किडीचे नियंत्रण करावे. बदलत्या हवामानामुळे रब्बी व फळबाग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. हरभरा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर मावा कीडा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.