कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी एक मृत्यू; नवे २७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:08+5:302021-03-07T04:27:08+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत सराफानगर २, मारवाडी गल्ली २, ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ १, गंगानगर २, गाडीपुरा ४, जिजामातानगर १, शेवगाव ...

One death for the second day in a row by Corona; 27 new patients | कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी एक मृत्यू; नवे २७ रुग्ण

कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी एक मृत्यू; नवे २७ रुग्ण

googlenewsNext

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत सराफानगर २, मारवाडी गल्ली २, ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ १, गंगानगर २, गाडीपुरा ४, जिजामातानगर १, शेवगाव १ असे १३ जण तर वसमतला ३, औंढ्यात १ बाधित आढळून आला आहे. बरे झालेल्या २४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये ससेवाडी १, विवेकानंदनगर १, गांधी चौक ६, नाईकनगर ३, विद्यानगर २, केंद्रा १, अकोला १, जिजामातानगर १, आडगाव १, खेर्डा १, गंगनगर १, सुराणानगर १, जि.प. क्वार्टर्स १, कमलानगर १ व १ अकोला येथील संदर्भितास आज डिस्चार्ज मिळाला आहे.

हिंगोलीतील कमलानगर भागातील एक ६६ वर्षीय महिला आज कोरोनाने दगावली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डात तिला भरती केले होते. यामुळे मृत्यूचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४३४८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३९४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजघडीला एकूण ३४३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: One death for the second day in a row by Corona; 27 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.