शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चार उमेदवारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:43 IST

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक पहिल्या तपासणीत खर्च सादर केलाच नाही

नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र उमेदवारी मागे घेतल्यानंतर २९ मार्च रोजी स्पष्ट झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांकडून होणारा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपये खर्चापर्यंतची मर्यादा आहे. हा खर्च वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ५ एप्रिल रोजी करण्यात आली.या तपासणीदरम्यान १४ उमेदवारांपैकी समाजवादी पार्टीचे अब्दुल समद, अपक्ष उमेदवार शिवानंद देशमुख, रणजित देशमुख आणि अशोक चव्हाण या चार उमेदवारांनी पहिल्या तपासणीत निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाचे विवरण निवडणूक विभागाकडे सादर केलेच नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिाित्व कायदा १९५१ च्या (७७) कलमान्वये या चार उमेदवारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये खर्च सादर करण्यात आला नाही, याबाबत विचारणा केली आहे.दरम्यान, उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाची दुसरी तपासणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या तपासणीत तरी हे उमेदवार आपला खर्च सादर करतील का? याकडे लक्ष लागले आहे.खर्चाचा हिशेब जुळविताना कसरत

  • निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रत्येक गोष्टीचे दर निश्चित केले आहेत़ त्यामध्ये जेवणातील पदार्थ,वाहने, प्रचाराचे साहित्य यातील प्रत्येक बाबींचा समावेश आहे़ त्यामुळे उमेदवारांना खर्चाचा हिशेब सादर करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे़ अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवार कटाक्षाने लक्ष ठेवून आहे़ आचारसंहिता पथकही उमेदवार कुठे अन् किती खर्च करीत आहेत, याची तपासणी करीत आहे़ त्यामुळे उमेदवार अन् त्यांच्या कार्यकर्त्यांची खर्च जुळविताना चांगलीच दमछाक होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे़
  • भाजपाचे माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खा़अशोकराव चव्हाण व डी़पी़सावंत यांची तक्रार केली आहे़ खा़ चव्हाण यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडातील सभा रद्द झाल्याचे आचारसंहिता भंग करणारे विधान केले असल्याचा आरोप केला़ तर डी़पी़सावंत यांनी चिखलीकरांच्या विरोधात अशोकराव खरे लीडर तर भाजपाचा उमेदवार दारुचे डीलर असे वक्तव्य केल्याचा आरोप पोकर्णा यांनी केला आहे़ तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे़
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग