शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद

By शिवराज बिचेवार | Updated: November 14, 2022 12:07 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी  येथे रविवारी  वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला.

- शिवराज बिचेवार
हिंगोली : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी  येथे रविवारी  वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. त्यात कुणी एकमेकांना खो दिला तर कुणी दांडूने विटी उंच आकाशात भिरकाविली. 
भारत यात्रींची व्यवस्था हिंगोली शहरातील तिरुमला लॉन्स या ठिकाणी करण्यात आली आहे. रविवारी यात्रेच्या विश्रांतीचा दिवस असल्याने सर्वच जण रिलॅक्स मूडमध्ये होते. रविवारी अनेकांनी उशिरापर्यंत अंथरुण सोडले नव्हते. तर काही जण झोपेचा बॅकलॉग भरून काढत होते. सकाळी चहा आणि नाश्ता झाल्यानंतर भारत यात्रींनी आपल्यासोबत आणलेल्या कपड्यांची धुलाई केली.  
यात्रा विश्रांतीच्या दिवशी भारत यात्रींसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात येते. त्यात रविवारी खास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मैदानी खेळ असलेला विटी-दांडू मागविला होता. तसेच काही गट हे खो-खो या खेळाचा आनंद घेत होते. अधिक वय असलेले भारत यात्री वेगवेगळी पुस्तके वाचण्यात दंग होते तर काही जण विविध विषयांवर चर्चा करीत होते.

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी