थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेसमाेर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:51+5:302021-02-24T04:31:51+5:30

जिल्ह्यात प्रेरक - प्रेरिकांची एकूण संख्या ११३० आहे. यापैकी ९४५ प्रेरक - प्रेरिकांनी सन २०१२ ते २०१८ या कालावधीत ...

Indefinite fast in front of Zilla Parishad for overdue honorarium | थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेसमाेर बेमुदत उपोषण

थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेसमाेर बेमुदत उपोषण

जिल्ह्यात प्रेरक - प्रेरिकांची एकूण संख्या ११३० आहे. यापैकी ९४५ प्रेरक - प्रेरिकांनी सन २०१२ ते २०१८ या कालावधीत गावपातळीवर निरक्षरांना साक्षर करण्याचे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा कोणताही मोबदला मिळाला नाही. संचालनालयातून जिल्ह्यातील प्रेरक - प्रेरिकांची माहिती मागविली. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ सेनगाव तालुक्यातील प्रेरक - प्रेरिकांची नावे संचालनालयाकडे पाठविली. परिणामी सेनगाव तालुक्यातील प्रेरक - प्रेरिकांना मानधन मिळाले आहे. उर्वरित प्रेरक - प्रेरिका मानधनापासून वंचित आहेत. यामुळे उर्वरित प्रेरक व प्रेरिकांनी मानधनासाठी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली. परंतु अद्याप या मागण्यांकडे लक्ष देण्यात आले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे अनेक प्रेरक - प्रेरिका मानधनापासून वंचित आहेत. याबाबत चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २३ फेब्रुवारी राेजी हिंगाेली जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

साक्षर भारत प्रेरक संघाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रेरक संघाचे सुनील गजभार, सायली कदम, कपील माेरे, साहेबराव मारकड, सचिन घुगे, सुदाम वाहुळे, रवी भगत, गंगाधर पारखे, अनिता कदम, सचिन कांबळे, विलास खोकले, मीनाबाई भुजबळे, गजानन कऱ्हाळे, सचिन दुधमल, मारोती बेले, सुधाकर खिल्लारे, प्रियंका खिल्लारे, सुनील कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फाेटाे न. ११

Web Title: Indefinite fast in front of Zilla Parishad for overdue honorarium