आवक जास्त; परंतु ग्राहकच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST2021-03-22T04:26:56+5:302021-03-22T04:26:56+5:30

दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी ३ ...

Income high; But no customers | आवक जास्त; परंतु ग्राहकच मिळेनात

आवक जास्त; परंतु ग्राहकच मिळेनात

दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात लॉकडाऊन सुरू केले आहे. दुपारी ३ वाजेनंतर भाजी मंडई बंद करण्यात येत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना भाज्यांवर पाणी शिंपडण्याची वेळ आली. रविवारी टोमॅटो १०, गाजर १०, पानकोबी १५, गवार १०, चवळी १०, फूल कोबी १०, वांगे १५, बटाटे १० किलोप्रमाणे विकले गेले. जिल्ह्यातून होणारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, कोरोनामुळे ग्राहक भाजी मंडईत येत नाहीत. दुसरीकडे भाजी विक्रीला पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे भाज्यांचा ढीग करून ठेवावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी दुपारी ३ ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंतची करावी, अशी मागणी भाजी विक्रेत्यांतून होत आहे.

Web Title: Income high; But no customers