शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये भाजी- भाकरी करण्यासाठी ...

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये भाजी- भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. हाताला कामच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकड्यानेही शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महिन्याभरात दोनवेळेस संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. तब्बल महिन्याभरापासून हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. आताही केवळ पार्सल देण्यासाठीच परवानगी दिली आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कुक असले, तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी महिला कामगार असतात. आता पार्सल सुविधा असल्याने हॉटेलमधील कर्मचारी संख्याही कमी करण्यात आली आहे. कर्मचारी कपातीची कुऱ्हाड महिला कामगारांवर पडली असून, अनेक महिला कामगारांचा रोजगार गेला आहे. महिन्याभरापासून हाताला कामच नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. घरभाडे, किराणा सामान, गॅस कसा खरेदी करायचा, याची चिंता आहे.

- शहरातील हॉटेलची संख्या - २९

हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या - ६२

हॉटेल बंद असल्याने हातचा रोजगार गेला आहे. दुसरे कामही मिळत नाही. कामच नसल्याने घरभाडे थकले आहे. घरात गॅस नाही, किराणा नाही, त्यामुळे दिवस कसा ढकलावा, हाच प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने हॉटेलवर काम करणाऱ्या महिलांना मदत केली पाहिजे.

- उषा धाकतोडे

हॉटेल बंद असल्याने हातचे काम गेले आहे. दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करावीत, तर कोरोनामुळे तेही काम काेणी देत नाही. हाताला कामच नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. किमान हाताला काम तरी शासनाने उपलब्ध करून द्यावे.

- सुमन घुगूळे

हॉटेलवर भाजी-भाकरीचे काम करीत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला होता. कोरोनामुळे हॉटेल बंद ठेवावे लागत असल्याने तेही काम गेले आहे. कामच नसल्याने हाती पैसाही राहत नाही. त्यामुळे लहान मुलांना जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

- अर्चना काळे

वर्ष कसे काढले, आम्हालाच ठाऊक!

जिल्ह्यात महिन्याभरात दोनवेळेस संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. महिन्याभरापासून हॉटेल व्यवसाय ठप्प असला, तरी मागील वर्षभरापासून अशीच स्थिती आहे. हॉटेल कामगारांना तर वर्षभरापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात महिला कामगारांना वर्षापासून काम मिळत नसल्याने वर्ष कसे काढले, आमचे आम्हालाच ठाऊक, अशी प्रतिक्रिया पोळी-भाजी बनविणाऱ्या महिला कामगाराने दिली. हॉटेल मालकांना दया आल्याने त्यांनी आमच्या पोटापाण्याची सोय केल्याने कसे तरी वर्ष ढकलल्याचेही महिला कामगार म्हणाली.